शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पाच जिल्ह्यांतील ११७ जणांवर गुन्हा

By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST

वन्यप्राणी मृत्यू प्रकरण : वनविभागातर्फे खटले दाखल; न्यायालयात सुनावणी सुरू; आजअखेर सहाजण निर्दोष

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर - वन्यप्राणी मृत्यूप्रकरणी २००९ ते जानेवारी २०१५ अखेर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील ११७ जणांवर विविध कलमांखाली वनविभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सर्व खटल्यांची सुनावणी कार्यक्षेत्रातील न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत सहाजण निर्दोष सुटले आहेत. खटल्यासंबंधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. शिकार, तस्करी आणि शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या उपाययोजनेमुळे वन्यप्राण्यांचे मृत्यू होतात. त्याप्रकरणी वनविभाग पोलिसांत वन्यप्राण्यांच्या मृत्यूस जबाबदार आढळलेल्यांवर गुन्हा दाखल करते. सन २००९ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील रानडुक्कराच्या मृत्यूप्रकरणी दोन, तर वाघाचे कातडे मिळाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. सांगली जिल्ह्यातील तीन कासव तस्करी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०१० मध्ये कासव तस्करप्रकरणी एक, तर चिपळूण तालुक्यातील तीन बिबट्यांच्या शिकारप्रकरणी आठजणांवर, तर रानकोंबडा हत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. बिबट्या शिकारप्रकरणातील तिघांची ९ आॅक्टोबर २०१२ला लांजा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. रानकोंबडा हत्याप्रकरणी शासनाच्या विरोधात निकाल लागला आहे. अपिलासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात सन २०११ साली दोन ससा शिकारप्रकरणी तिघांवर, एका सांबराला मारल्या प्रकरणी चौघांवर तर एका माकडाच्या हत्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. सांगली जिल्ह्यात एक माकड शिकारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. चिपळूण तालुक्यात एका बिबट्याच्या शिकारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी फरार आहे. सन २०१२ मध्ये ससा, भेकर, मोर यांच्या शिकारप्रकरणी विविध ठिकाणच्या १४ जणांवर गुन्हा झाला आहे. न्यायालयात सुनावणी चालू आहे. सांगली जिल्ह्यातील मांडूळ साप, कासव तस्करप्रकणी नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भेकर, शेकरू, वाघ, सांबर, बिबट्या, गवा, गेळा, काळवीट, चिंकारा, मगर यांची शिकार झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. २०१४ मध्ये सावंतवाडी तालुक्यात गवा, सांबर शिकारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यात मांडूळ साप, कासव तस्करप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (क्रमश:)तब्बल ३,३४६ जनावरे फस्त...सहा वर्षांत ८४ वन्यप्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी ११७ जणांवर ३३ गुन्हे दाखल केले आहेत. याउलट जंगलात आणि लगतच्या शेतात चरण्यासाठी गेलेल्या ३ हजार ३४६ पाळीव जनावरे वन्यप्राण्यांनी २००४ ते २०१४ अखेर फस्त केली. सर्वाधिक म्हणजे सन २०१३ मध्ये ५२० जनावरांचा बळी वन्यप्राण्यांनी घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यास वनविभागाने भरपाई दिली आहे. भरपाई किरकोळ असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.वन्यप्राणी मानव संघर्ष भाग २