औरंगाबाद : वर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांत मराठवाड्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यातील ४६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली. यंदा आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणे बीड जिल्ह्णातील आहेत. मराठवाड्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला व त्यानंतर अतिवृष्टीने पिकांची प्रचंड नासाडी झाली. त्यामुळे पेरणीसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज यातून शेतकऱ्यांची सुटका झाली नाही. अडचणीतल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. गेल्या वर्षी येथे १ हजार ५३ शेतकऱ्यांनी जीवन संपविले होते. यावर्षीही पहिल्या दोन महिन्यांतच ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ४६ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली, तर १३ प्रकरणे अपात्र आहेत. ५८ प्रकरणांमध्ये मदतीची प्रतीक्षा आहे.
११७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: March 2, 2017 05:07 IST