शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी वीज पुरविण्याचा ११७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: December 28, 2016 20:52 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 28 - जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले असून इतरही ठिकाणच्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, केवळ विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येणे अशक्य झाले आहे. दरम्यान, उशिराने जाग आलेल्या महावितरणने यासंबंधीचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. तो देखील गेल्या चार महिण्यांपासून मंत्रालयात मंजूरीच्या प्रतीक्षेत अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा सुमारे ५०० कोटीचा अनुशेष आजही कायम आहे. तो काही अंशी दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पांना सुप्रमा प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्यामुळे ही कामे विनाविलंब पूर्ण झाली. तथापि, सिंचनाच्या बाबतीत माईलस्टोन ठरू पाहणाऱ्या बॅरेजेसच्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकऱ्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले. मात्र, सिंचनाकरिता लागणाऱ्या विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बॅरेजेसची उपयोगिता शून्य ठरली असल्याचे दिसून येत आहे. महावितरणने उशिरा का होईना पाच ते सहा महिन्यांपूर्वी बॅरेजेस प्रकल्प परिसरासह जिल्ह्यातील इतर प्रकल्प परिसरात वीज पुरविण्यासंबंधी ३३/११ केव्हीचे ३ वीज उपकेंद्र, ५ एमव्हीचे ६ ट्रान्सफार्मर, १०० केव्हीचे ९४२ ट्रान्सफार्मर, यासह इतर महत्वपूर्ण आवश्यक बाबींचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. त्यास हिरवी झेंडी देत साधारणत: चार महिन्यांपूर्वी  तो मंत्रालयाच्या दरबारात पोहोचला. मात्र, तेथून या प्रस्तावाची फाईल पुढे सरकली नसल्यामुळे हा प्रश्न अद्याप जैसे थे रखडला आहे. वाशिम जिल्ह्यातील विजेसंदर्भात शासनाकडे सादर करण्यात आलेल्या ११७ कोटी रुपयांच्या प्रस्तावासंबंधी शासनाकडून अद्याप अधिकृतरित्या काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंबंधी आपणास विशेष अशी काहीच माहिती देता येणार नाही. डी.आर.बनसोडे अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम