शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

११६पॅरा टॅरोटोरियल बटालियनच्या जवानाचा अपघातात मृत्यू; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:52 IST

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी रात्री पत्नी व मुलासह देवळाली कॅम्पमार्गे भगूर परिसरातील शिंगवेबहुला येथे घरी दुचाकीवरून जात असताना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

ठळक मुद्दे इनोव्हा (एमएच .०४ जी.सी १२५) मोटारीने जोरदार धडक दिली. गवळी हे ११६ पॅरा टॅरिटोरियल सैन्य बटालियनमध्ये सैनिक म्हणून लष्करात सेवेत. पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या

नाशिक : गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी रात्री पत्नी व मुलासह देवळाली कॅम्पमार्गे भगूर परिसरातील शिंगवेबहुला येथे घरी दुचाकीवरून जात असताना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश कचरू गवळी (३३)  यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत गवळी यांच्या मृतदेहावर शिंगवेबहुला गावात शोक ाकूल वातावरणात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.गवळी हे ११६ पॅरा टॅरिटोरियल सैन्य बटालियनमध्ये सैनिक म्हणून लष्करात सेवेत होते. महिनाभराची सुटी घेऊन ते पत्नी माधुरी व सहा वर्षीय मुलगी गिरिजा आणि तीन वर्षीय अवंती यांच्यासह रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले. तेथून दुचाकीवरून जात असताना लॅमरोडवर एसव्हीकेटी महाविद्यालयासमोर गतिरोधकावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून इनोव्हा (एमएच .०४ जी.सी १२५) मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत गवळी व त्यांची पत्नी, मुलगी खाली कोसळले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास एसव्हीकेटी महाविद्यलयाजवळ आपल्या दुचाकीचा वेग गतिरोधक जवळ आल्यामुळे गवळी यांनी कमी केला; मात्र याचवेळी पाठिमागून येणाºया मोटारचालकाच्या सदर बाब लक्षात आली नाही. त्यामुळे त्याने वेग नियंत्रणात आणला नाही आणि गवळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत गवळी यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीला नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र या डॉक्टरांनी गवळी यांना तपासून मयत घोषित केले. सदरचे वृत्त लष्करी विभागाला समजताच टी.ए.बटालियनच्या अधिकाºयांनी गवळी यांचे पार्थिव धोंडीरोड मार्गावरील लष्करी शवगृहात ठेवले.

सकाळी वरिष्ठ लष्करी अधिकाºयां उपस्थितीत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गवळी यांचे पार्थिव शिगवे बहुला येथे नेण्यात आले. सकाळपासूनच गावात शोकाकुल वातावरण होते.दुपारी पार्थिव गावात येताच वातावरण अधिकच भावूक झाले होते.येथील स्मशानभूमीत लष्कराच्या वतीने अधिकाºयांनी पुष्पचक्र अर्पण केले. जवानांनी बंदुकीच्या तीन फैºया झाडून गवळी यांना अखेरची मानवंदना दिली. गवळी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार अशोक गवळी यांचे ते बंधू होत.