शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

११२ शस्त्रे शासनजमा

By admin | Updated: February 16, 2017 13:42 IST

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वत:च्या व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली ११२ शस्त्रे शासनजमा करण्यात आली आहे़

११२ शस्त्रे शासनजमाशहरातील गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'अमरावती : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वत:च्या व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली ११२ शस्त्रे शासनजमा करण्यात आली आहे़ दरम्यान अमरावती शहरात व ग्रामीण भागात घडणाऱ्या दैनंदिन गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन व निवडणूक विभागाचा 'वॉच' आहे़ अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ जणांजवळ रिव्हॉल्वर आहेत़ १२ बोरगण व इतर गण असा ६८ जणांकडे शस्त्रपरवाना आहेत़ जिल्ह्यात ११२ जण शस्त्रपरवाना धारक आहे़त यात अचलपूर तालुक्यात तब्बल २३ जणांनी परवाना घेतला आहे़ दुसऱ्या क्रमांकावर वरूड तर तिसऱ्या क्रमांकावर मोर्शी तालुका आहे़ धामणगाव तालुक्यातील पाच जणांंकडे शस्त्रपरवाना आहे़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोघांकडे हा परवाणा आहे़ अमरावती शहरातील शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे़ अमरावती महानगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी १० दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत, ती शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश मागील आठवड्यात प्रशासनाने दिले होते़ संबंधित शस्त्र परवानाधारकांना केवळ पाच दिवसांचा अल्टिमेटम प्रशासनाने दिला होता़ गत दोन दिवसांत जिल्ह्यातील ११२ शस्त्र परवाना धारकांनी आपले शस्त्र पोलीस प्रशासनाच्या हवाली केले आहेत़ संबंधित शस्त्रपरवाना धारकांना रीतसर पोच पावती देण्यात आली असून निवडणुकीचा निकाल व आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही शस्त्रे संबंधितांना परत करण्यात येणार आहे़त. गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'४महानगरपालिका व ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे़ घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे़ यामागे निवडणुकीचा तथा मतदानाचा काही संबंध आहेत का यासंबंधीच्या गुन्हेगारीवर पोलीस व निवडणूक प्रशासनाचा वॉच आहे़बोगस मतदारांवर फ ौजदारी कारवाई४ज्या मतदारांनी नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत मतदान केले़, त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही़, अशी नावे आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करून संबंधित मतदारांच्या नावाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने यंत्रणेला दिले आहेत़मतदारांच्या वाहतुकीस कारवाई४ मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर खासगी वाहनाने मतदारांना आणण्याचे प्रकार होतात़ यावर आता आयोगाची नजर राहणार आहे़ ज्या वाहनातून मतदार येत असेल ते वाहन त्वरित जप्त करून वाहनचालक व वाहन मालकावर थेट कारवाई होणार आहे़