शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर राज्यात ११२ कारवाया

By admin | Updated: January 3, 2017 22:23 IST

नोटाबंदी लागू झाल्यानंतर राज्यात आयकर विभागाच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 -  नोटाबंदी लागू झाल्यानंतर राज्यात आयकर विभागाच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत आयकर विभागाने राज्यात आतापर्यंत ११२ कारवाया केल्या. त्यात नागपूर विभागातील ५० कारवायांचा समावेश आहे. तसेच, आतापर्यंत २०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता घोषित झाली आहे. आयकर (तपास) पुणे विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली.नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा दिला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत बेहिशेबी रक्कम घोषित करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊन पैसा सन्मानाने वापरण्यास पात्र व्हा. अन्यथा काळ्या पैशांचा लोभ करणाऱ्यांना भविष्यात कुणीही तारू शकणार नाही, असे त्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.प्रत्येक आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. शासनाच्या संबंधित निर्णयानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा एका क्षणात साधा कागद झाल्यात. अनेक करोडपती तत्काळ रोडपती झालेत. काळा पैसा पांढरा करण्याच्या पळवाटा बंद करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णयांत बदल केले. त्यावरून सर्वांनी बोध घेणे आवश्यक आहे असे गुप्ता यांनी सांगितले. पैसा बँकेत जमा केल्यामुळे पांढरा व जवळ बाळगल्यामुळे काळा होत नाही. पैशाचा स्रोत स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात कुणालाही काळा पैसा वापरता येणार नाही. आयकर विभाग आधुनिक तंत्रज्ञान वापरून अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण करीत आहे. विविध स्रोतांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. यामुळे पप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन साठवलेली रक्कम घोषित करा. यामुळे नियमानुसार काही रक्कम सन्मानाने वापरण्यासाठी मिळेल. आयकर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास संपूर्ण अघोषित रक्कम हातातून जाईल व त्यावर ७ टक्के अधिकची रक्कमही द्यावी लागेल. याशिवाय अन्य कायदेशीर निर्बंध येतील ते वेगळेच असे गुप्ता यांनी सांगितले.