शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

१,११,१११ गणेशचित्रांचा विश्वविक्रम

By admin | Updated: October 19, 2015 03:00 IST

चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या ओंकारस्वरूप श्रीगणेशाचे १ लाख ११ हजार १११ रेखाचित्रांचे जगातील सर्वांत मोठे प्रदर्शन भरवून ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाने नवा विश्वविक्रम स्थापित केला.

औरंगाबाद : चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या ओंकारस्वरूप श्रीगणेशाचे १ लाख ११ हजार १११ रेखाचित्रांचे जगातील सर्वांत मोठे प्रदर्शन भरवून ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाने नवा विश्वविक्रम स्थापित केला. औरंगाबादच नव्हेतर जालना व बीड जिल्ह्यांतील सुमारे २६०पेक्षा अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी असामान्य कामगिरी करून दाखविली. उल्लेखनीय म्हणजे, मागील २३ दिवसांत ‘लोकमत’ने दुसरा विश्वविक्रम नोंदविला आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला १७ विद्यार्थ्यांनी ५३ मिनिटांत ४,४२५ गणेशचित्रे रेखाटून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.‘लोकमत’तर्फे आयोजित व राजुरी स्टील प्रस्तुत आणि ‘एमकेसीएल’ व ‘लोकसेवा स्टेशनर्स’ प्रायोजित ‘आपले बाप्पा’ उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. १,११,१११ गणेशचित्रांचे विश्वविक्रमासाठी उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात १ लाख ६० हजार गणेशचित्रे पाठवून विद्यार्थ्यांनी अतूट विश्वविक्रम करण्याचा दृढनिश्चय पूर्ण केला. प्रोझोन मॉल येथे भरविण्यात आलेल्या व गणेशाच्या चित्रांचे जगातील सर्वांत मोठ्या प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्याचा बहुमान विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आला. व्यासपीठावर ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, मानवविकास आयुक्त भास्कर मुंढे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, विक्रीकर सहआयुक्त डी. एम. मुगळीकर, पुरवठा उपआयुक्त वर्षा ठाकूर, विमानतळ प्राधिकरणचे संचालक आलोक वार्ष्णेय, उपआयुक्त विजयकुमार फड, पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अनिल रामोड, आदर्श महिला बँकेचे संस्थापक अंबादास मानकापे, राजुरी स्टीलचे पंकज पांडे, एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, लोकसेवा स्टेशनर्सचे अविनाश फरसुले, प्रोझोन मॉलचे अनिल इरावणे, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी रेखा सिंग, जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, संजय बारवाल, नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, रेखाचित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांमधील प्रातिनिधिक स्वरूपात ११ विद्यार्थ्यांचा राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला. त्यात राधिका कासार, उमंग काला, दीपाली कदम, श्रुती जाधव, प्रिया मालेवार, आर्यन वाढे, श्रावणी आहेर, मीनाक्षी रोडगे, तन्मय पवार, गायत्री मैड, राधिका म्हस्के, गौरी अग्रवाल, आकांक्षा शिंदे, सोहन आहेरकर, आरती कोटिया, श्रुती तांबोळी, निकिता सदाफुले व प्रतीक्षा पालवे यांचा समावेश होता. सुमारे ५० हजार चौ. फूट जागेवर हे विश्वविक्रमी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यातून कल्पकतेची चुणूक बघण्यास मिळाली. ओम्काराची लाखो रूपे साकारताना एकही रूप सारखे नव्हते, हे विशेष. विद्यार्थ्यांनी लाडका बाप्पा कॅन्व्हॉसवर रेखाटला आहे. पारंपरिकच नव्हे, तर आधुनिक रूपातही गणराया बघण्यास मिळत आहे. यात ‘ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहेना साथ हमेशा’ अशी सादही चित्रातून बाप्पाला घालण्यात आली होती. शालेय गणवेशातील बाल गणेश, महादेवाची पिंड खांद्यावर घेऊन जाणारा बाहुबली गणेश, गिटार वाजविणारा गणेश, टीम इंडियात क्रिकेट खेळणारी मंगलमूर्ती, तर काहींनी आईच्या अक्षरातून गणेश साकारला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा आविष्कार पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)‘हिप हॉप डान्सर’ सुरेश मुकुंद याने ढोलताशाच्या गजरात प्रेक्षकांमधून दमदार एंट्री केली. त्याच्याशी हात मिळविण्यासाठी व सही घेण्यासाठी चाहते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. सुरेशने विश्वविक्रमाबद्दल लोकमत, सर्व शाळा व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. १७वर्षीय हृतिक गुप्ता याने आपल्या लवचीक अंगाने सादर केलेल्या कवायतींमुळे सर्व जण चकित झाले. कार्यक्रम संपल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडाच घातला. ‘आरती क्रिएशन डान्स ग्रुप’च्या कलावंतांनी गणरायाच्या स्तुतीपर गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. साई वादळ ढोल पथकानेही रसिकांची मने जिंकली.>दोन दिवस प्रदर्शनउद्घाटनानंतर रविवारी शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. सोमवारी आणि मंगळवारी प्रोझोन मॉल येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.>न भूतो न भविष्यती विश्वविक्रम गणपती या देवतेच्या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ने भरविलेल्या १ लाख ११ हजार १११ गणेश रेखाचित्रांच्या प्रदर्शनाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असाच उल्लेख या विश्वविक्रमाचा करावा लागेल. यापूर्वी चित्रप्रदर्शनाची विश्वविक्रमात नोंद झाली; पण एवढ्या प्रचंड प्रमाणात रेखाचित्रांचे हे जगातील एकमेव प्रदर्शन ठरले आहे. या माध्यमातून ‘लोकमत’ने औरंगाबादेतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना विश्वविक्रमात सहभागी होण्याचा मान मिळवून दिला. - रेखा सिंग, प्रतिनिधी, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड