शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला १.१० कोटीचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा २७.६६ लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:19 IST

माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांकडून १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २७ लाख ६६ हजार ७३३ रुपयांचे जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) : माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांकडून १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २७ लाख ६६ हजार ७३३ रुपयांचे जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी यात्रेनिमित्त भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या पायावर १५ लाख ५० हजार ६ रुपये, रुक्मिणी मातेच्या पायावर ४ लाख ४१ हजार ५७६ रुपये, अन्नछत्र देणगीतून २ लाख १६ हजार १०३ रुपये, पावती स्वरूपातील देणगीतून ४१ लाख ५३ हजार २७० रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्रीतून १८ लाख ६८ हजार ८८ रुपये, राजगीरा लाडू विक्रीतून ४ लाख ७७ हजार ५२० रुपये, फोटो विक्रीतून ४४ हजार ३५० रुपये, भक्त निवास देणगीतून २ लाख ९७ हजार ६३५ रुपये, नित्यपूजा १ लाख ७५ हजार रुपये, विठ्ठल विधी उपचार ८ हजार रुपये, हुंडी पेटीतून ६ लाख ५४ हजार ५१० रुपये, परिवार देवता व दक्षिणा पेटीतून ४ लाख १७ हजार २७६ रुपये, आॅनलाइन देणगीतून १ लाख ३६ हजार ६१७ रुपये तर अन्य स्वरूपातून ५ लाख ९८ हजार ८८१ रुपये असे १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले.- मागील वर्षी माघी यात्रेच्या काळात ८२ लाख ७२ हजार ९६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.- माघ शुद्ध १ ते माघ शुद्ध १५ या कालावधीत ३ लाख ६४ हजार ८८४ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.- यामध्ये १ लाख ४५ हजार ७७१ भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन तर २ लाख १९ हजार ११३ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर