ठाणे : एलबीएस रोड येथील एंजल या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ११ बारबालांसह ५ जणांना अटक केली. या कारवाईत १ लाख ६२ हजार ६६० रु पयांची रोकड हस्तगत करीत वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा दाखल झाला.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एंजल बारमध्ये ११ बारबालांचे ग्राहकांसोबत अश्लील हावभाव आणि चाळे सुरू असल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिसांनी या बारवर छापा टाकला. या वेळी नियमांचे उल्लंघन करत अश्लील हावभाव करत नृत्य करताना काही बारबाला सापडल्या. काही आरशाच्या मागे असलेल्या छुप्या खोलीत लपल्या होत्या. त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी बारमालकासह कॅशिअरविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच.एस. क्षीरसागर करीत आहेत. (प्रतिनिधी)
११ बारबालांसह ५ जणांना अटक
By admin | Updated: May 30, 2016 04:26 IST