शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर दंगलप्रकरणी ११ जणांना अटक

By admin | Updated: May 10, 2016 04:00 IST

किरकोळ कारणातून श्रीरामपूरमध्ये रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी शहरातील वातावरण निवळले. मात्र, भीतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : किरकोळ कारणातून श्रीरामपूरमध्ये रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी शहरातील वातावरण निवळले. मात्र, भीतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत.शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीप्रकरणी पोलिसांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अतुल वढणे, विश्व हिंदू परिषदेचे विजय जैस्वाल, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, संजय यादव यांच्यासह एकूण ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील ११ जणांना अटक करण्यात आली. १० आरोपींना १३ मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.दोन वाहनांच्या धडकेनंतर रविवारी रात्री दोन गट समोरासमोर येऊन त्यांनी दुकाने, गाड्यांची जाळपोळ केली. रात्रीच पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणली. जिल्हाधिकारी अनिल कवडे सकाळीच शहरात दाखल झाले. त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदारांसोबत दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी व जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेऊन लोकांमध्ये विश्वास व सुसंवादाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)

शिरपूरमध्ये १० वाहनांची नासधूसशिरपूर (धुळे) : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन शिरपुरात रविवारी रात्री दोन गटात दंगल उसळली. दंगेखोरांनी पोलिसांच्या गाडीसह १० वाहनांची नासधूस करून दोन वाहने जाळली. दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहे. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे़ घटनास्थळी जिल्हा पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मराठे गल्ली व वीर सावरकर चौकात दगडफेकीमुळे दगड व विटांचा मोठा खच पडला होता़