शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

स्वाइनचे ११ रुग्ण आढळले

By admin | Updated: February 14, 2015 04:11 IST

ताप, सर्दी, पडशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवावर बेतणाऱ्या स्वाइन फ्लूने महाराष्ट्र पोखरायला घेतला. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांत १७ दिवसांच्या कालावधीत स्वाइनचे

सुरेश लोखंडे, ठाणेताप, सर्दी, पडशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवावर बेतणाऱ्या स्वाइन फ्लूने महाराष्ट्र पोखरायला घेतला. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांत १७ दिवसांच्या कालावधीत स्वाइनचे सुमारे ११ रुग्ण आढळून आले आहेत. यासाठी सुमारे १० हजार ७७६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, पालघर परिसरात मृत्यू झालेला रुग्ण अन्य जिल्ह्यातील असल्यामुळे त्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी अद्यापही आढळून येत नाही. याशिवाय कल्याण, बदलापूर व नवी मुंबईत झालेले सुमारे तीन मृत्यू केवळ संशयित म्हणून असल्यामुळे त्यांची नोंददेखील अद्याप घेण्यात आलेली नाही. पण, आढळलेल्या स्वाइनच्या रुग्णांची प्रकृती सुधारत असून संशयितांवरही तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयांसह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, कुटीर रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंदे्र व उपकेंद्रे आणि खाजगी हॉस्पिटल आदी ठिकाणी सुमारे २३७ तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी सुमारे १० हजार ७७६ जणांची तपासणी केली असता त्यातून सुमारे ११जणांसह तीन संशयित ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. संशयितांच्या तपासणीमध्ये स्क्रिनेड, स्वाब घेऊन त्यांची तपासणी शासनाच्या चार लॅबसह खाजगी दोन लॅबमध्ये युद्धपातळीवर केली जात आहे. या ११ रुग्णांपैकी आठ रुग्ण आजमितीस उपचार घेत असून तीन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी २४ आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. यापैकी ठाणे सिव्हील रुग्णालयात सहा वॉर्ड असून ठाणे मनपाचे चार, नवी मुंबईत दोन, रायगडमध्ये तीन तर उल्हासनगर, वसई, भिवंडी या ठिकाणी प्रत्येकी एक वॉर्ड सुरू आहे. येथे नऊ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी तीन संशयित असल्याचा दावा आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी केला. नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून त्वरित औषधोपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.