शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११ नवीन स्थानकांना मंजुरी

By admin | Updated: May 30, 2016 04:08 IST

कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण करतानाच ११ नवीन स्थानकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण करतानाच ११ नवीन स्थानकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. या ११ पैकी बहुतांश स्थानके महाराष्ट्रातील असून, त्यामुळे कोकणातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.मध्य रेल्वेकडून दिवा ते रोहापर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. हे काम करताना कोकण रेल्वेकडील दुहेरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव बरीच वर्षे मागे पडला होता. त्यानंतर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरपर्यंतच्या टप्प्याचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)>तीन वर्षांमध्ये पूर्ण होणार कामही स्थानके साधारपणे तीन वर्षांत बांधली जातील आणि त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कोलाड ते ठोकूरपर्यंत ६५ स्थानके असून, ११ स्थानकांची भर पडल्यास स्थानकांची संख्या ७६ होईल.>८ नोव्हेंबर २0१५ रोजी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष कामाला मे २०१६ नंतर सुरुवात केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे दुहेरीकरण करतानाच कोकण रेल्वेकडून आणखी ११ नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. >या प्रस्तावाला २० दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. ही स्थानके साधारपणे तीन वर्षांत बांधली जातील आणि त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कोलाड ते ठोकूरपर्यंत ६५ स्थानके असून, ११ स्थानकांची भर पडल्यास स्थानकांची संख्या ७६ होईल. >नवीन ११ स्थानके : इंंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, कडवई, कलवणी, पोमेंडी, वेरवली, खारेपाटण, अचिर्णे, मिरझण, इनान्जे. कोकण, गोवा, केरळ, कर्नाटकमधील खासदार, प्रवासी संघटना, आमदार आणि रेल्वे अधिकारी यांचा समावेश असलेल्या कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेशन कमिटीशीही याबाबत चर्चा करून नव्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याशिवाय कोकण रेल्वे दुहेरीकरणात ११ मोठे आणि १७८ छोटे पूल, १७ रोड अंडर ब्रीज आणि १७ फाटकेही असतील बांधण्यात येतील.