कोल्हापूर : दि पीपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी पेठवडगाव संचलित महाराष्ट्र अकॅडमी रिसर्च अँड ट्रेनिंग इस्टिट्युटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त चित्रकलेचे महाप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. जोतिबा ते पन्हाळा या दरम्यान एक ठिकाण निश्चित करून २६ जानेवारीपासून प्रदर्शनाला प्रारंभ होईल. ११ महिने ११ दिवस प्रदर्शन चालणार आहे. असे भव्यदिव्य विश्वविक्रमी प्रदर्शन भरवण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धनाजी कराडे यांनी आज, रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितली.कराडे म्हणाले, हौशी शिल्पकार, चित्रकार, विद्यार्थी यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळणार आहे. कलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या नावलौकिकात या महाप्रदर्शनामुळे भर पडणार आहे. स्थानिक कलाकारांना या प्रदर्शनामुळे आपल्या कलागुणांना वाव देण्यास चालना मिळेल.या कला प्रदर्शनात अश्मयुग ते आधुनिक युगापर्यंतच्या मानवी विकासाचे विविध टप्पे, घटना, प्रदर्शन शिल्पकला, चित्रकला यांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार यांचे शिल्प प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. कॉम्पोझिशन, पेंटिंग, पोट्रेटस, हेड, लॅडस्पेक, स्टिल लाईफ, भरतकाम, ओरीगामी या प्रकारांतील कलाकृत असतील. अशा स्वरूपाचे हे अनोखे प्रदर्शन ठरणार असल्याचे कराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
११ महिने ११ दिवस चालणाऱ्या चित्रकला महाप्रदर्शनाची तयारी
By admin | Updated: December 28, 2014 23:21 IST