शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरील अपघातात ११ जखमी

By admin | Updated: May 1, 2017 04:45 IST

दादर-माटुंगा उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. स्कॉर्पिओ गाडीने मित्राचा

मुंबई : दादर-माटुंगा उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. स्कॉर्पिओ गाडीने मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे जात असताना हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने दुभाजकाला धडक दिल्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकवर ती आदळली. या अपघातात स्कॉर्पिओमध्ये बसलेल्या ९ जणांसह ट्रकचालक आणि क्लिनर जखमी झाले. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भांडुपच्या लोकमान्य नगर येथे राहणारे हे ९ तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शनिवारी रात्री १ च्या सुमारास भांडुप येथून मरिन ड्राइव्हकडे निघाले. रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी माटुंग्याच्या नानालाल मेहता उड्डाणपुलावर आली. गाडी वेगात असल्याने गाडीचालक पराग शिर्के याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी उड्डाणपुलावरील दुभाजकावर येत सायनच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. अपघाताच्या आवाजाने गस्तीवर असलेल्या माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले. स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)