शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका नेमणार ११ निवडणूक अधिकारी

By admin | Updated: January 1, 2017 22:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 1 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार, पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी एकुण ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. १० निवडणूक निर्णय अधिकाठयांकडे तीन प्रभाग तर एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील १० महापालिका, २६ जिल्हापरिषदा आणि २९६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेची काम पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदार यादीचे महापालिका प्रभागनिहाय विभाजन करण्याची काम सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे आवश्यक आहे. त्याबाबतचे सूत्र, धोरण निश्चित करण्यात आले आहे.एखाद्या जिल्ह्यात जर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार संवर्गातील अधिकारी उपलब्ध नसतील तेव्हा महसुल विभागातील इतर जिल्ह्यांमधून आवश्यक अधिकारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागिय आयुक्तांवर असेल. तथापि, अधिकारी उपलब्ध न झाल्यास इतर महापालिकांमधील उपायुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमता येणार आहे. राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्ररभाग पद्धत रद्द करून चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे. त्यानुसार, बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीस अनुसरून तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याबाबत सुधारीत आदेश जारी केला आहे. महापालिकेतील निवडणुकीसाठी ३२ प्रभागांनुसार, प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी एकुण ११ निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत. १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तीन प्रभाग तर एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन प्रभागांची जबाबदारी असेल.