शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

११ बड्या प्रकल्पांची औरंगाबादला हुलकावणी

By admin | Updated: July 10, 2017 05:21 IST

दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ११ बड्या प्रकल्पांच्या गुंतवणुकीची फक्त चर्चाच आजवर झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ११ बड्या प्रकल्पांच्या गुंतवणुकीची फक्त चर्चाच आजवर झाली. हे सर्व प्रकल्प डीएमआयसीऐवजी इतरत्र पळवून नेले गेले. गेल्या सहा महिन्यांत तीन मोठ्या कंपन्या महाराष्ट्राच्या हातून निसटल्या. परिणामी, सुमारे २० ते २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि लाखाहून अधिक रोजगाराला मराठवाडा मुकला आहे. महिंद्रा, फोक्सवॅगन, नेस्ले, हीरो, होंडा, फोर्ड, मारुती सुझुकीनंतर किया मोटार्स, एलजी, एसएआयसी या प्रकल्पांची गुंतवणूक डीएमआयसीमध्ये होणार अशी फक्त चर्चाच झाली. पण हे उद्योग दुसरीकडेच गुंतवणुकीसाठी सरसावले. शासनाने डीएमआयसीच्या दोन नोडमध्ये भूसंपादनासाठी ३ हजार कोटी रुपये गुंतविले. शिवाय, आॅरिक सिटीच्या प्रशासकीय हॉल व इतर सुविधांच्या विकासाची कामे गतिमान केली आहेत. बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील १,३९० कोटींचे टेंडर अंतिम झाले आहे. शेंद्रा डीएमआयसीतील प्रशासकीय इमारत डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. पहिला टप्पा २०२० पर्यंत, दुसरा टप्पा २०२१ पर्यंत, तर तिसरा टप्पा २०२२ पर्यंत होईल. ४५ मीटर रोड याअंतर्गत विकसित होईल, त्यात ड्रेनेज, विद्युत, साइड ड्रेन, भारतात प्रथमच रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिकल स्ट्रेंच वापरण्यात येणार आहे. शेंद्रा ते बिडकीन असा एनएचएआय रोड विकसित केला जाणार आहे. जालन्यातील ड्रायपोर्ट ते शेंद्रा हे अंतर ४० कि.मी. आहे. ४५ कि़मी.वर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शेंद्रा-बिडकीन इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी ७ हजार ९४७ कोटींची तरतूद बजेटमध्ये झालेली आहे. असे असतानाही मोठे प्रकल्प विदर्भात आणि राज्याबाहेर का जात आहेत. याबाबत विचार करणे गरजेचे आहे. एसएआयसी गुजरातला जाणार एलजी, किया मोटार्स पाठोपाठ आता एसएआयसी (शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन) या चीनच्या बड्या कंपनीने औरंगाबादच्या डीएमआयसीला हुलकावणी दिली आहे. एसएआयसीने पुणे आणि औरंगाबादमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी केली. मात्र, गुजरातमधील हल्लोळ येथे या कंपनीने टप्प्याटप्प्याने २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. एमजी ब्रँड कारचे उत्पादन या प्रकल्पातून केले जाणार आहे.>प्रतीक्षेपलीकडे काहीही नाही किया मोटार्स, एलजी, एसएआयसीने हुलकावणी दिल्यानंतर आॅरिकमध्ये मोठ्या उद्योगाची प्रतीक्षा लागलेली आहे. शेंद्रा आणि बिडकीनमध्ये सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. आॅरिकमध्ये उद्योग भेटी देत असल्याचे फक्त दावे होत आहेत. सध्या तरी कुठलाही मोठा उद्योग डीएमआयसीच्या संपर्कात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.