शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नांदु-याला ‘हनुमान नगरी’ ओळख देणारा १०५ फूटी ‘हनुमान’

By admin | Updated: August 23, 2016 19:28 IST

प्रत्येक गावातील वैशिष्टयानुसार त्या गावाची ओळख असते अशीच नांदुरा शहराची ओळख आता देशभरात हनुमान नगरी म्हणून होत आहे ती येथील भव्य १०५ फूट विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान मुर्तीमुळे.

किशोर खैरेजि.बुलडाणा, दि. २३ : प्रत्येक गावातील वैशिष्टयानुसार त्या गावाची ओळख असते अशीच नांदुरा शहराची ओळख आता देशभरात हनुमान नगरी म्हणून होत आहे ती येथील भव्य १०५ फूट विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान मुर्तीमुळे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेल्या नांदुरा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेला असता खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याला गाडीतील कांद्याचा क्वॉलीटी आवडली. सदर कांदा नांदुरा येथील समजल्यानंतर शिवराम मोहनराव नामक आंध्र प्रदेशातील त्या व्यापाऱ्याने नांदुरा गाठले व नांदुरा येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नांदुरा परिसरात कांदा, मिरची व धान्य बाजारपेठेत व्यवसाय सुरु केला.

श्री हनुमानजी तथा श्री बालाजी ह्या देवतांचे भक्त असल्यामुळे यांचे मंदीर बनविण्याची प्रेरणा मिळाल्यानंतर मोहनराव यांनी नांदुरा शहरात १९९९ मध्ये श्री तिरूपती बालाजी संस्थान या न्यासची स्थापना केली. तिरूपती येथे दर्शनासाठी गेले असता मोहनराव यांना हनुमानची व दुसरी गरूड मुर्ती दिसून आल्यानंतर हनुमानजींची ४०-५० फुट उंच मुर्ती बनविण्याचा निश्चय त्यांनी केला. घरी आल्यावर नियोजित मुर्तीची बांधकामाची योजना सुरू झाली व खर्चाचा आढावा घेतला गेला. या मुर्तीसाठी ४० ते ५० लाख रूपये खर्च येईल, अशी योजना बनली. याचवेळी दिल्ली येथे ७९ फुट उंचीची मुर्ती बनत असल्याचे ऐकले. त्यामुळे ते स्वत: बेचैन झाले.

नियोजित ४०-५० फुट उंचीची मुर्ती बनविण्याचे ऐवजी मोठी मुर्ती बनविण्याचा मानस तयार झाला व शेवटी भारतातील सर्वात उंच १०८ फुट उंचीची मुर्ती निर्माण करण्यावर ठाम मत झाले व १९९९ मध्ये भुमिपूजनानंतर बांधकामास प्रारंभ होवून ३१ आॅक्टोबर २००१ पर्यंत पुर्ण करण्यात आली. महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यात ग्राम नांदुरा गावाचे पश्चिमेस राष्ट्रीय महामार्गावर १०५ फुट उंच महाकाय श्री हनुमानाची मुर्ती बनविली आहे. मुर्ती अतिशय सुंदर व वैशिष्ट्यपुर्ण आहे. मुर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेले तिलक लावलेले आहे.

मुर्तीमध्ये १ इंच ते १२ इंच साईजचे १ हजार नग कृत्रिम डायमंड बसविलेले आहे. मुर्तीचे डोळे २७ बाय २४ ह्या आकाराचे असून मानवाचे नकली डोळे बनविणाऱ्या कंपनीत बनविले गेले आहेत. मुर्तीवर ३.५ क्विंटल फुलांचा विशाल हार रिमोटव्दारा चढविला जातो. महाकाय विशाल मुर्तीला स्नान अभिषेक करण्याची व्यवस्था असून हा अभिषेक देखील रिमोटव्दाराच केला जातो. हे जलाभिषेकचे दृष्य फारच विलोभनीय दिसते, अशी सुंदर, विविधतेने नटलेली, जगातली सर्वात या उंच मुर्तीची सन २००३ मध्ये लिमका बुक आॅफ नॅशनल रेकॉर्डसमध्ये देशात सर्वात उंच मुर्ती असल्याची नोंद झाली आहे. या महाकाय मुर्तीला लागुन मागच्या बाजुस श्री बालाजी मंदीराचे भव्य बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर निर्माणावर सुध्दा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे.

दर्शनासाठी मंदीरात दुरूदूरून पर प्रांतातून दर्शनार्थी येतात. पुजा, अभिषेक व दर्शन घेऊन प्रसन्न होतात. अनेक भक्तांच्या मनोकामनाही पुर्ण होतात. दर्शनार्थी, मुर्तीची भव्यता व सुंदरता पाहून मंत्रमुग्ध होतात. यामुळे आजरोजी नांदुरा शहराला हनुमान नगरी म्हणून ओळख येथील १०५ फूट भव्य अशा हनुमान मुळे मिळाली आहे.