शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा बीच सफाईचा शंभरावा आठवडा, बकाल वर्सोवा बंदर होणार स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:58 IST

बकाल वर्सोवा बंदर स्वच्छ करण्यासाठी, २ आॅक्टोबर २०१५ साली वर्सोवा रेसिडन्ट आॅर्गनायझेशन (व्हीआरव्ही) आणि वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी १०० आठवडे पूर्ण झाले आहेत.

मनोहर कुंभेजकर ।मुंबई : बकाल वर्सोवा बंदर स्वच्छ करण्यासाठी, २ आॅक्टोबर २०१५ साली वर्सोवा रेसिडन्ट आॅर्गनायझेशन (व्हीआरव्ही) आणि वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी १०० आठवडे पूर्ण झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण प्रमुखांनी वर्सोवा बंदरचा ३ किमीचा परिसर स्वच्छ करणा-या या मोहिमेचा गौरव, जगातील सर्वात मोठी किनारा स्वच्छता मोहीम म्हणून महात्मा गांधी जयंती दिवशी केला होता.सुमारे दोन वर्षांपासून दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती, अ‍ॅड. आफरोज शाह यांनी दिली. शाह यांनी सांगितले की, गेल्या ९९ आठवड्यांत सुमारे ७ कोटी ३० लाख किलो कचरा येथून गोळा करण्यात आला आहे. शनिवारी १००वा आठवड्यानिमित्त या ठिकाणी स्वच्छता सोहळा पार पडला. त्यात सुमारे २ लाख ५० हजार किलो कचरा गोळा करण्याचे काम सुमारे २ हजार स्वयंसेवकांनी केले. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतरही समुद्राच्या पोटातील कचरा किना-यावर जमा होतो. त्यात प्लॅस्टिकच्या विशेष करून, दुधाच्या पिशव्या आढळून येतात. या पिशव्या कोळी बांधवांच्या जाळ्यात सापडत असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार नेते राजहंस टपके यांनी या वेळी दिली, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी या मोहिमेचे कौतुक केले. जानकर यांच्यासह या मोहिमेत आमदार भारती लवेकर, नगरसेविका प्रतिमा खोपडे, रंजना पाटील, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, अभिनेता रणदीप हुडा आदी सहभागी झाले होते.