शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्मक्लेश पदयात्रेसाठी सांगलीतून 10000 भाकरी

By admin | Updated: May 24, 2017 21:39 IST

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतक-यांसह राज्यातील शेतकरीही

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 24 - खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतक-यांसह राज्यातील शेतकरीही हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी १० हजार भाकरी व खरडा जमविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार दि. 25 रोजी अंकलखोप (ता. पलूस) येथून पाच हजार आणि दि. २६ रोजी नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी पाच हजार भाकरी पाठविणार आहेत.
पदयात्रेत सांगली जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले, भास्कर कदम, भरत चौगुले, वैभव चौगुले, संदीप राजोबा, सुदर्शन वाडकर, सचिन डांगे, विनायक जाधव, बाबा सांद्रे, पोपट मोरे, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सर्व शेतकºयांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली पाहिजे, साखरेचे दर वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळाला पाहिजे, स्वामीनाथन् आयोगाच्या  शिफारशी लागू कराव्यात, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी यांसह अन्य मागण्यांसाठी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे.
 
सोमवार दि. २२ पासून पुणे येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवार दि. २४ रोजी आत्मक्लेष पदयात्रेचा मुक्काम वाकसई (ता. मावळ, जि. पुणे) येथील संत तुकाराम महाराज पादुका वृक्ष येथे होता.
गुरूवार दि. २५ रोजी खोपोली (जि. रायगड) येथे मुक्काम आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत, तर दि. २६ रोजी नांद्रे येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत. प्रत्येक शेतकºयाच्या घरातून, अशा भाकरी आणि खरडा जमविण्याचे नियोजन आहे. पदयात्रेतील कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दि. ३० तारखेपर्यंत मिरज तालुक्यातील दुधगाव, समडोळी, तुंग, कवठेएकंद, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, मालगाव, बेडग, आरग, म्हैसाळ, पलूस तालुक्यातील शेतकरी रोज भाकरी व खरडा पाठविणार आहेत, असेही महावीर पाटील यांनी सांगितले.
 
पुणे, मुंबईतील ससांगलीकरांचा आंदोलनात सहभाग-
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले जे नागरिक पुणे, ठाणे, मुंबई आणि अन्य शहरांच्या परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त राहतात, तेथील हजारो नागरिक शिदोरीसह आंदोलनात बुधवारी सहभागी झाले. कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असल्यामुळे पदयात्रा निश्चितच यशस्वी होणार असून आंदोलनापुढे सरकारला झुकावेच लागेल, असे महावीर पाटील यांनी सांगितले.