शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गणेश मंदिरातील वटवृक्ष @ १०० वर्षे

By admin | Updated: June 9, 2017 03:27 IST

सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात.

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत वृक्षवल्लींचा ऱ्हास होऊ लागला. त्याला डोंबिवली शहरही अपवाद नाही. मात्र, डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातील वडाच्या झाडाला तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील ८५ वर्षांपासून तो वटपौर्णिमेचा साक्षीदार आहे. मोहन दातार यांनी सांगितले की, त्यांचे वडील शंकर दातार, लिखिते आणि कानिटकर यांनी १९१५ मध्ये गणेश मंदिराजवळ वडाचे झाड लावले. त्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या वडाच्या झाडाचे पूजन जवळपास ८५ वर्षांपासून आजपर्यंत सुरू आहे. डोंबिवलीतील विधवा महिला आंबूताई गोडबोले यांना मंदिराने पुरोहिताचे काम दिले होते. ही विधवा महिला मंदिराचे पौरोहित्य करत होती. त्या वेळी मंदिराकडून त्यांना दरमहा १० रुपये मानधन दिले जात होते. त्या काळी महिलांना पौरोहित्य करण्याचा अधिकार नव्हता. गणेश मंदिराने १०० वर्षांपूर्वी गोडबोले यांना तो अधिकार देऊन पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपली होती. १० रुपये मानधन मिळणाऱ्या खर्चातून गोडबोले या त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या. एका महिन्याची मानधनाची रक्कम व त्यात आणखी १५ रुपये टाकून त्यांनी जवळपास २५ रुपयांचा खर्च केला. या खर्चातून त्यांनी वडाशेजारी एक पार बांधून घेतला. त्याच पारानजीक मंदिरातील अनेक शुभकार्ये उरकली जात होती. गणेश मंदिरातील अनेक कार्यक्रम या पारावर होत होते. हा पार डोंबिवलीतील भक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा साक्षीदार आाहे. याच पारावर स्वरभास्कर भीमसेन जोशी व छोटा गंधर्व, राम मराठे यांच्या गाण्याच्या संगीत मैफली झाल्या आहेत. १९७९ च्या आसपास गणेश मंदिराचे रूपडे पालटले. मंदिर चांगल्या प्रकारे बांधून घेण्यात आले. त्यामुळे पाराचे स्वरूप बदलले. मंदिरात सभागृह असल्याने आता कार्यक्रम पारावर होत नाहीत. मागच्या दिवाळीच्या सणाला पारावर किल्ल्यांचे प्रदर्शन भरवले होते. आता पथनाट्यांचे कार्यक्रम तेथे केले जातात. त्यामुळे जनजागृतीचा आधार असेही या वटवृक्षाला संबोधले जाते. १०० वर्षांपूर्वी मंदिरातील दानपेटीत पाच रुपयांचे दान जमा होत होते. तसेच धान्यस्वरूपात दोन रुपये किमतीचे तांदूळ जमा होत होते. मंदिर संस्थानचा विकास होत गेला. नागरिकीकरण वाढले. मंदिराचा विस्तार झाला. त्यामुळे पाराची जागा कमी झाली. आता पाराखाली टाइल्स लावून ती जागा सुशोभित करण्यात आली आहे. रोज केर काढला जातो. ज्येष्ठ नागरिक त्याच्या सावलीत आपला फावला वेळ घालवतात. त्याच्या संध्याछायेच्या काळात हा वड त्यांच्या शिरावर सावली धरतो. पतीला वटवृक्षाइतके आयुष्य लाभू देवडाच्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर असतात. ही मुळे पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे वड एक प्रकारे जलसंवर्धन करणारा वृक्ष आहे. तसेच तो दीर्घायुषी वृक्ष प्रकारात मोडतो. त्यामुळे त्याचे वयोमान १०० ते २०० वर्षे इतके असू शकते.डोंबिवलीतील हा वटवृक्ष १०० वर्षांचा साक्षीदार झाला आहे. तो डोंबिवलीची ओळख बनला आहे. पूर्वी मंदिरातील कार्यक्रम याच पारावर झाले आहेत. हा वड अनेक कार्यक्रमांचाही साक्षीदार आहे. डोंबिवलीतील महिला दरवर्षी वटपौर्णिमेला भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने या झाडाचे पूजन करतात. पतीचे आयुष्य वटवृक्षाच्या आयुष्याइतके व्हावे, अशी मनोकामना त्या करतात.