शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एकरी तब्बल १०० टन उसाचे उत्पादन!

By admin | Updated: December 21, 2015 02:22 IST

उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल

नंदकिशोर नारे,  वाशिमउत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल १०० टन उसाचे उत्पादन घेऊन फायदेशीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला. १८ हजार रुपये उत्पादन खर्चात या शेतकऱ्याने तब्बल दोन लाखांचे उत्पन्न मिळवले. ग्राम बेळखेड येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन जिजेबा अवताडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. ते नेहमीच शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात.यावेळी त्यांनी एक एकर शेतातआठ हजार रुपयांचे बियाणे व खत, तसेच तणनाशकावर दहा हजार रुपये असे १८ हजार रुपये खर्च करून उसाची लागवड केली.बी-बियाणांचा प्रमाणबद्ध वापर, पुरेसे पाणी आणि पिकाची योग्य निगा यांच्या बळावर त्यांनी उसाचे एकरी १०० टन उत्पादन मिळवले. सध्या उसाचा दर २००० रुपये प्रतिटन आहेत. त्यामुळे अवताडे यांच्या उसाची सध्याची किंमतदोन लाखांच्या घरात आहे. त्यांनी उसामध्येच हरभऱ्याचे पीकही घेतले. यासाठी त्यांना पाच हजार रुपयेखर्च आला. त्यांना १० क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न मिळाले आहे. हरभऱ्याचे ४० हजार आणि उसाचे दोन लाख रुपये मिळून एका एकरात त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास आर्थिक विकास निश्चित होईल. नवनवीन धोरण अवलंबून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करायला हवे.- गजानन अवताडे, अल्पभूधारक शेतकरी, बाळखेड,ता. रिसोड, जि. वाशिम