शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील फळबागांना १००% अनुदान

By admin | Updated: March 25, 2016 02:23 IST

दुष्काळामुळे फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या या बागायतदारांना नव्याने फलोत्पादन करण्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून

मुंबई : दुष्काळामुळे फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या या बागायतदारांना नव्याने फलोत्पादन करण्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. मराठवाड्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना खडसे बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी शाश्वत विकासाच्या योजनांवर भर देण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीला आवश्यक पाणीपुरवठ्यासाठी जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजनांवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे खडसे म्हणाले.मागेल त्याला शेततळे देण्याच्या योजनेत ५० हजार रुपयांचे बंधन केवळ यंत्राच्या साहाय्याने तळे खोदण्यासाठी आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळी तयार करण्यासाठी लागेल तेवढा निधी वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे खडसे यांनी सांगितले. मराठवाड्याच्या हक्काचे १८ टीएमसी पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घेऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काचे गेल्या तीन वर्षांतील तब्बल ३१ कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असून चालू शैक्षणिक वर्षाच्या रकमेचा आढावा घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कमाफीबाबत विचार केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले.विदर्भालाही मदत : नागपूर खंडपीठाने ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर जागे झालेल्या राज्य सरकारने बुधवारी विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ येथील ५८१० आणि नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील ६५५२ गावांमध्ये राज्यातील इतर दुष्काळी भागातील गावांप्रमाणे सवलती देण्याचे जाहीर केले. महसूलमंत्री खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत याबाबतचे निवेदन केले.