शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१००% शाळा प्रगत करण्याचा अट्टाहास

By admin | Updated: March 27, 2016 01:18 IST

केवळ आठवडाभरात १०० टक्के शाळा प्रगत करण्याचा अट्टाहास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरल्याने शिक्षकांची कोंडी झाली आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक शाळा डिजिटल करावी

- अविनाश साबापुरे,  यवतमाळकेवळ आठवडाभरात १०० टक्के शाळा प्रगत करण्याचा अट्टाहास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरल्याने शिक्षकांची कोंडी झाली आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक शाळा डिजिटल करावी, असे फर्मानदेखील शिक्षण आयुक्तालयातून निघाले असून या ‘मार्च एण्डिंग’साठी गुरुजींची धावपळ सुरू आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यासाठी २२ जून २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. तेव्हापासून वर्षभरात राज्यात ११ हजार २२८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. मात्र, या शाळा डिजिटल होण्यासाठी शिक्षकांचीच धडपड मोलाची ठरली. शासनाकडून दमडीही न घेता शिक्षकांनी गावकऱ्यांना शाळेचे महत्त्व पटवून देऊन निधी गोळा केला. त्यातून डिजिटल शाळेला लागणारे टॅब, प्रोजेक्टर, संगणक, एलईडी टीव्ही आदी महागडे साहित्य खरेदी केले. गावकऱ्यांनीही थोडीथोडकी नव्हे तर, तब्बल ४९ कोटी ३८ लाख रुपयांची वर्गणी डिजिटल शाळांसाठी दिली. आता शैक्षणिक सत्र लवकरच संपणार आहे. सत्र संपण्यापूर्वीच प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा अट्टाहास शिक्षण आयुक्तालयाने धरला आहे. यासाठी ‘मिशन मोबाइल डिजिटल शाळा’ असे नवे फर्मान काढण्यात आले. शिक्षकांनी आपल्याजवळील अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलला स्पीकर आणि मॅग्निफायर लावून शाळेत त्याचा दृक्श्राव्य माध्यम म्हणून वापर करायचा. अन् त्यालाच मोबाइल डिजिटल स्कूल म्हणायचे, या आयुक्तांच्या आदेशाने ग्रामीण भागातील शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. मॅग्निफायर (मोबाइल स्क्रीनवरील दृश्य मोठ्या आकारात दाखविणारे साधन) स्वस्त असले तरी ते अनेक छोट्या शहरांमध्ये सहज उपलब्ध होत नाही. ही साधने शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून खरेदी करायची आहेत.शिक्षकांनी आपल्याजवळील अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलला स्पिकर आणि मॅग्निफायर लावून शाळेत त्याचा दृकश्राव्य माध्यम म्हणून वापर करायचा. अन् त्यालाच मोबाईल डिजिटल स्कूल म्हणायचे, या आयुक्तांच्या आदेशाने ग्रामीण भागातील शिक्षकांची तारांबळ उडाली आहे.