शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अन्न प्रक्रिया उद्योगात १००% विदेशी गुंतवणूक

By admin | Updated: February 17, 2016 03:17 IST

देशातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी या क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला

मुंबई : देशातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी या क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय अन्न व औषधी प्रक्रिया मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी दिली.‘अन्न प्रक्रिया उद्योग मेक इन इंडिया : अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी’ या विषयावरील परिसंवादात श्रीमती बादल बोलत होत्या.कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भारतात मोठ्या प्रमाणात संधी असून याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आपण स्वत: आग्रही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी एकूण ४२ फूड पार्क उभारण्याचे आमचे ध्येय आहे. त्यापैकी ५ उभारण्यात आले असून तिघांचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील ३० महिन्यांत हे उद्योग सुरु होतील. या माध्यमातून ५ हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्येक फुड पार्कमुळे २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल. याशिवाय प्रत्येक फूडपार्कमधून ६ हजार लोकांना रोजगार निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.