शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

By admin | Updated: July 4, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले

मुंबई : दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल १00 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुष्काळग्रस्त भागांत यापुढे जास्तीतजास्त प्रवासी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या अनेकांनी स्थानिक पातळीवरचा आणि लांबचा प्रवास टाळला. याचा फटका एसटी सेवांना बसू लागला. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तर एसटीची स्थिती फारच बिकट झाली. बसेस आगार आणि स्थानकांत उभ्याच करून ठेवण्यात येत होत्या. एसटीचे भारमान घटत गेले आणि उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ लागला. जानेवारी ते मार्चदरम्यान दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाला होती. मात्र तसे झाले नाही. एप्रिल ते जूनदरम्यान उत्पन्न तब्बल ८४ कोटी रुपयांनी घटले. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीशी तुलना केल्यास हे उत्पन्न फारच कमी असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एकूणच जानेवारी ते जूनदरम्यान एसटीला १00 कोटींपेक्षा जास्त फटका बसला. सहा महिन्यांत एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता नव्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत. ज्या भागात दुष्काळामुळे फटका बसला त्या भागातून जास्तीतजास्त प्रवासी आणि उत्पन्न कसे मिळविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)>लग्नसराईत ३९ कोटी३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी लग्नसराई जास्त असल्याने त्याचा फायदा घेत एसटीने जादा वाहतूक केली आणि जवळपास ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळवले. मात्र मे महिना सुरूहोताच भारमान पुन्हा घसरत गेले. त्यामुळे उत्पन्न मिळवूनही त्याचा फारसा फायदा एसटीला झाला नाही. दुष्काळामुळे एसटीचे भारमान घसरले आहे आणि मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे यापुढे अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. - रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ सुरुवातीच्या तीन महिन्यांत ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याने जूनपर्यंत हा आकडा १00 कोटी पार करेल, असा अंदाज एसटी महामंडळाकडून आधीच वर्तविण्यात येत होता.