शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी १०० कोटी

By admin | Updated: June 11, 2016 02:08 IST

म्हाडाच्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे.

मुंबई : म्हाडाच्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. जुन्या भाडेतत्त्वावरील इमारतींची स्थिती सुधारणे, विकासकांद्वारे भाडेकरूंची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी तसेच लहान भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासह जुन्या भाडेकरूंना मालकी हक्क प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महत्त्वाचे म्हणजे जुन्या आाणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाडेकरूंच्या प्रतिनिधी मंडळाच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली; या वेळी ते बोलत होते. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी शासनाने १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करावी, अशी मागणी लोढा यांनी या वेळी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निधी वाटपास सहमती दर्शवली. भाडेकरू आणि विकासकामधील पुनर्विकासाच्या करारासाठी तीस दिवसांच्या आत मॉडेल अ‍ॅग्रिमेंट ड्राफ्ट तयार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. १०० महिन्यांचे एकरकमी भाडे आणि खुली जागा हे दोन मुद्दे निकाली काढण्यासाठी ३० दिवसांच्या आत अहवाल मागवला जाईल आणि रहिवाशांच्या हिताचा विचार केला जाईल, असेही फडणवीस यांनी या वेळी नमूद केले. दरम्यान, या शिष्टमंडळामध्ये आमदार राज के. पुरोहित, तामिल सेल्वन, मलबार हिल भाजपाचे अध्यक्ष धनेश कानेटकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)