शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिकार केल्यास १० वर्षांची शिक्षा

By admin | Updated: December 15, 2015 04:00 IST

शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला

नागपूर : शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत आढळून आलेल्या दोन वाघांचा मुद्दा उपस्थित करीत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, एका वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला. राज्यात शिकारींच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाघांची संख्या वाढून १९० झाली आहे. सन २०१३ मध्ये ७ वाघांची शिकार झाली. २०१४ मध्ये केवळ एकाच वाघाची शिकार झाली. २०१३ मध्ये ५, २०१४-४, आणि २०१५ मध्ये ६ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या टायगर फोर्समुळे शिकारीवर नियंत्रण ठेवता आले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघासाठी १० वर्ग किलोमीटरचे वन क्षेत्राची गरज असते. त्यामुळे वन क्षेत्र वाढविण्याचा विचार होत आहे. केंद्राने व्याघ्र प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मेळघाट, पेंच आणि ताडोबाला केंद्राने अतिउत्तम असे म्हटले आहे.जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघाच्या मृत्यूनंतर वन विभागातर्फे त्याचे पोस्टमार्टम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वाघाचे वय आणि मृत्यू कसा झाला याची माहिती मिळते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी वाघांच्या शिकारीत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, शिकार रोखण्यासाठी ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांना शस्त्रे आणि वायरलेसने सज्ज करण्यात आले आहे. गुप्त माहिती देणारी यंत्रणाही मजबूत करण्यात येत आहे. याशिवाय ज्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वाघ वाढले की वाघिण शिकारीच्या प्रश्नावर सभागृहातील वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित करून वातावरणाला हलके केले. अमिताभ बच्चन हे टायगर अ‍ॅम्बेसडर बनल्यापासून वाघांची संख्या वाढली की वाघिणींची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा ‘नहले पे दहला’ मारत याची माहिती शोधण्यासाठी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान भुजबळ यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत राज्यात सध्या वाघांचे गुरगुरणे वाढले आहे. मुख्यमंत्री त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.