शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दोन महिन्यांत १० वाघांचा मृत्यू

By admin | Updated: May 31, 2016 06:36 IST

निम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे

गणेश वासनिक,  अमरावतीनिम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे. गत दोन महिन्यांत दहा वाघ मृत्यमुखी पडले आहेत. मात्र, व्याघ्र संरक्षण दलातील सुरक्षा रक्षकांना यापैकी एकही वाघ दिसू नये, ही बाब त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.केंद्र शासनाने वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन केले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहणार असून त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात विदर्भातील वाघांची संख्या अधिक असून त्यांना शिकाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचे आव्हान या दलापुढे आहे. याशिवाय व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या परिसरात वन्यप्राण्यांचा पायी मागोवा घेणे, वाघांचे सूक्ष्म नियोजन करणे, यशिवाय नैसर्गिक अधिवास समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करुन एकूणच वाघांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे. परंतु गत दोन महिन्यांत मेळघाटात दोन तर चंद्रपूर, बोर, गोंदिया, भंडारा आदी भागांत ७ ते ८ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दलाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्रत्येकी तीन, पेंच दोन तर नवेगाव बांध, नागझिरा येथे प्रत्येकी एक दल तयार करण्यात आले आहे. ताडोबात १२० तर मेळघाटात ८१ जवान या दलात कार्यरत आहेत. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेषाधिकार आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्वर, वाहने, राहण्याची व्यवस्था, रजेचे नियोजन करण्यात आले आहे. या दलात स्थानिक आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे.