शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार जैन करणार सामूहिक उपवास

By admin | Updated: September 12, 2015 02:14 IST

‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा.

भार्इंदर : ‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जैन गौरव रक्षा समितीच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी भार्इंदर मधील १० हजार जैन सामुहिक उपवास व मंत्रजाप करणार आहेत,’ अशी माहिती आचार्य सागरचंद्र सागर सुरीश्वरजी महाराज यांनी बावन जिनालय जैन मंदिरातील पत्रकार परिषदेत दिली. मीरा भार्इंदर महापालिकेच्या महासभेत भाजपाने कत्तलखाने बंदीचा ठराव केला होता. त्या विरोधात देशभरात पडसाद उमटले असुन शिवसेने पाठोपाठ मनसे, आरपीआय, बविआ, राष्ट्रवादी व काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मीरा भार्इंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर गीता जैन आदींची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. ‘बाळासाहेब ठाकरे व शिवसेने बद्दल सहानुभुती आहे. उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनीच थेट जैन समुदायाला टार्गेट केल्याने आम्ही देखील चकीत झालो आहोत. भाजपाशी तुमचा काय वाद असेल ते तुम्ही बघा, पण जैनांना टार्गेट का करता,’ असा सवाल सागरचंद्रजी यांनी केला. पक्षांच्या राजकारणात समाजाला ओढू नका, असे ते म्हणाले.मुंबई आमची !‘मुंबई ही कोणा एका जातीची नाही असे ते म्हणाले. आम्ही पण गणपती, जन्माष्टमी आदी वेळी सहकार्य करतो. या आधी ८ दिवस बंदीचे ठराव झाले. यंदा १८ दिवसांचा झाला. भाजपाचे २९ व अन्य सर्वांचे मिळून ६१ नगरसेवक असतानाही ठराव मंजूर झाला. दर दिवशी प्रत्येकी ३ हजार रुपये नुकसानभरपाई देतो व द्यायला तयार होतो, असे त्यांनी सांगितले.शाकाहारी राहूनही जगता येते. जे आम्हाला समजून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी उद्या प्रार्थना करणार असल्याचे सागरचंद्रजी यांनी सांगीतले. शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळात बावन जिनालय मंदिरा मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उपवास व मंत्रजाप आदी केले जाणार आहे.