शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांवर विद्यार्थी अद्याप आधार लिंकविना!

By admin | Updated: April 20, 2017 00:49 IST

अमरावती विभागातील स्थिती : आधार क्रमांक अपलोड करण्यास तांत्रिक अडचणी

अकोला : शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय योजना, शिक्षण विभागाच्या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोड करण्यात येत आहेत; परंतु गत चार महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील ११ हजार ७२७ शाळांमधील १० लाख ३९ हजार विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोडच होत नसल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय योजना व शैक्षणिक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येतात. या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी त्यांचे आधार कार्ड क्रमांक शाळेमार्फत सरल आॅनलाइन डेटाबेसवर टाकण्यात येत आहेत. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये ७ लाख ८१ हजार ४२५ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करण्यात आले; परंतु उर्वरित १० लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकच सरल आॅनलाइन डेटाबेसवर अपलोड नसल्यामुळे शाळांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अमरावती विभागातील एकूण ११ हजार ७२७ शाळांमधील २२ लाख ९२ हजार ३९४ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करायचे होते; परंतु डाटाबेसच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. चार महिने उलटूनही हीच परिस्थिती कायम आहे. यासंदर्भात अनेक शाळांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करावेत तरी कसे, असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे. सरल आॅनलाइन डेटाबेसवर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड न झाल्यामुळे विद्यार्थी विविध योजनांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.