शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१० दूध संघांचे सदस्य महानंदच्या निवडणुकीस अपात्र

By admin | Updated: February 4, 2016 04:11 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळ निवडीसाठी राज्यातील १० सहकारी दूध संघांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळ निवडीसाठी राज्यातील १० सहकारी दूध संघांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. संचालक म्हणून निवडून येण्याबरोबरच नियुक्त होण्यास, नामनिर्देशित होण्यास किंवा स्वीकृत सदस्य होण्यासही ते अपात्र असतील. विहित मुदतीत अग्रीमांची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनी थकबाकीदार १० दूध संघांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली व सुनावणी घेतली. अग्रीम वेळेत परत न केल्याने संचालक मंडळ निवडीकरीता ते व त्यांचे मतदार प्रतिनिधी निवडून येणाऱ्या नवीन संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्त होण्यास, नामनिर्देशित होण्यास, निवडून येण्यास किंवा स्वीकृत सदस्य होण्यास अपात्र ठरले आहेत. चाळीसगाव तालुका सहकारी दूध संघाने त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम भरली असली तरी हा संघ अंतरिम अवसायनात असल्यामुळे हा संघ व त्याचे प्रतिनिधी प्रमोद पाटील हे आता होणाऱ्या महासंघाच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यास अपात्र ठरले आहेत. नियमानुसार राज्यातील नोंद झालेले जिल्हा अथवा तालुका दूध संघ किंवा संस्था हेच महासंघाचे सदस्य असू शकतात. त्यामुळे बहुराज्यीय सहकारी दूध संस्था संघ हे महासंघाचे सदस्य राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)१) बुलढाणा जिल्हा सहकारी दूध संघ -(३५.९७), २) सोनहिरा तालुका सहकारी दूध संघ, सांगली (१६.६४), ३) शेवगाव तालुका सहकारी दूध संघ, अहमदनगर (३६.८९), ४) नाशिक जिल्हा सहकारी दूध संघ (४९.८८), ५) दूधगंगा तालुका सहकारी दूध संघ, इंदापूर, पुणे (३१.८०), ६) श्रीरामपूर तालुका सहकारी दूध संघ, अहमदनगर (४.४३), ७) चंद्रपूर जिल्हा सहकारी दूध संघ (१३.३४), ८) चाळीसगाव तालुका सहकारी दूध संघ, जळगाव (२.८१), ९) भूम तालुका सहकारी दूध संघ व १०) जालना जिल्हा सहकारी दूध संघ हे दोन्ही संघ अवसायनात गेले आहेत.२