शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

१० दोषी तर तिघे सुटले

By admin | Updated: March 30, 2016 03:20 IST

मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष प्रीव्हेन्शन आॅफ टेररिझम अ‍ॅक्ट (पोटा) न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले. या बॉम्बस्फोटांत १२ जण ठार

मुंबई : मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष प्रीव्हेन्शन आॅफ टेररिझम अ‍ॅक्ट (पोटा) न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले. या बॉम्बस्फोटांत १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणी तिघांची सुटका करताना न्या. पी. आर. देशमुख यांनी १० जणांची शिक्षा बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.बहिष्कृत असलेल्या ‘सिमी’चा महासचिव साकीब नाचन, अतिफ नाझीर मुल्ला, हसीब झुबैर मुल्ला, गुलाम अकबर खोतल, मोहम्मद कामिलशेख, फरहान मलिक खोत, नूर महम्मद अन्सारी, डॉ. वाहीद अब्दुल अन्सारी, अन्वर अली जावेद खान आणि मुझम्मिल अख्तर अब्दुल अन्सारी यांना विशेष पोटा न्यायालयाने तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले आहे. तर नदीम पोलाबा, हरुन रशीद लोहार आणि अदनान मुल्ला यांची सर्व आरोपांतून सुटका केली आहे. (प्रतिनिधी) हत्या, देशाविरुद्ध युद्ध छेडले...तिन्ही बॉम्बस्फोटांचा एकच कट रचण्यात आल्याने या तिन्ही बॉम्बस्फोटांचा खटला एकत्रित चालवण्यात आला. सर्व आरोपींना हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे व अन्य आयपीसी कलमांखाली तसेच आर्म्स अ‍ॅक्ट, रेल्वे अ‍ॅक्ट, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स अ‍ॅक्ट आणि पोटाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांना कोणती शिक्षा द्यायची यावर बुधवारी सरकारी वकील रोहिणी सॅलियन व बचावपक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होईल. सूड उगवण्यासाठी बॉम्बस्फोट ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये असलेल्या मॅकडोनल्ड रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट झाला. दुसरा बॉम्बस्फोट २७ जानेवारी २००३ रोजी विलेपार्ले येथील भाजीबाजारात झाला. तर तिसरा बॉम्बस्फोट सीएसटी- कर्जत या लोकलमधील महिला डब्यात मुलुंड स्टेशनला झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या सर्व आरोपींनी बाबरी मशीद पाडल्याचा व गुजरात दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट केले.साकीब नाचन सूत्रधारस्फोटाचा सूत्रधार साकीब नाचन व लष्कर- ए- तोयबाचा पाकिस्तानी सदस्य फैझल खान यांनी २३ जणांसह हे बॉम्बस्फोट घडवले. या केसमधील पाच जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. तर पाच जण अद्याप फरारी आहेत. बॉम्बस्फोटासाठी मनुष्यबळ, दारुगोळा पुरवण्याचे काम नाचनने केल्याचा आरोप आहे.