शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

१० फुटी अजगराला मिळाले जीवदान

By admin | Updated: May 21, 2016 03:10 IST

पेण बोरगाव नारायणवाडी येथील घराच्या अंगणात भक्ष्याच्या शोधात आलेला १० फुटी अजगर जाळ्यात अडकून पडला.

पेण : पेण बोरगाव नारायणवाडी येथील घराच्या अंगणात भक्ष्याच्या शोधात आलेला १० फुटी अजगर जाळ्यात अडकून पडला. या वाडीवरच्यांनी पेणचे सर्पमित्र किरण देव यांना पाचारण करून, देव यांनी या अजगराची सोडवणूक करून जीवदान दिले.२० ते २२ किलो वजनाचा हा अजगर रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात आला असावा. मात्र शिकार करण्याआधीच जेरबंद झाल्याने जाळ्यात निपचित पडला होता. मात्र सर्पमित्र किरण देव यांनी त्या अजगराची सुटका के ली. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आल्याने वनक्षेत्रपाल शिवाजी पवार यांनी या सापाला संवर्धनाच्या दृष्टीने ताब्यात घेवून पेण वनपाल पी. के. म्हात्रे व त्यांचे सहकारी वसंत पोईलकर, माने यांनी अजगराला दूर जंगलात सोडून दिले. सरीसृप वर्गातील सर्वात आधी जन्माला आलेला हा साप यांची वाढ २० ते २२ फुटांपर्यंत होते. तर पायथोन रेटीक्यूलाटस प्रजातीतील अजगर ३० ते ३५ फुटापर्यंत वाढतो. भरपूर आहार या सापाचा मुख्य गुणधर्म असून आहाराच्या शोधात जागा निश्चित करून तो दबा धरून बसतो. प्रचंड ताकदीचा हा साप झाडावर, पाण्यात सहजगत्या वावरतो, मात्र खाद्य मिळाल्यानंतर सुस्त आळशी हा स्वभावगुणधर्मामुळे लोकांचे लक्ष वेधून घेणारा आणि गारूड्यांचा आवडता साप म्हणून सर्वत्र परिचित आहे.पेण वनक्षेत्रात सरीसृपाची मोठी चहेलपेहेल आहे. किंगकोब्रा, नाग, मण्यार, घोणस, धामण यांच्या बरोबरीने अजगरांची संख्याही फार मोठी आहे. सध्या अजगर सापांची फार मोठी वस्ती खाडीकिनारच्या कांदळवनांत आहे. झाडावर राहणारे हे मोठे साप समुद्र खेकडे, पक्षी, पक्ष्यांची अंडी याबरोबरीने रानडुकरांची छोटी पिल्लेही भक्ष्य म्हणून फडशा पाडतात. बिनविषारी वर्गातील हा साप सध्या भक्ष्य शोधत वाडी - वस्त्यांवरच्या कोंबड्या, बकऱ्यांची पाडस यांना गिळंकृत करण्यासाठी जंगलातून लोकवस्तीच्या दिशेने येतात त्यामुळे सापांच्या वावराच्या ज्ञात असलेल्या लोकवस्तीमध्ये घराच्या परसदारी काटेरी कुंपणाला नायलॉनचे जाळे लावण्याची पध्दत आहे. (वार्ताहर)