शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून १0 ‘डिजिटल’ शाळा

By admin | Updated: February 15, 2016 02:08 IST

कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पुढाकाराने १0 ‘डिजिटल’ शाळा.

प्रफुल्ल बाणगावकर/ कारंजा लाड : शहरी भागातील इंग्रजी शाळांकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा असताना, कारंजा तालुक्यात शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी लोकसहभागातून तालुक्यात १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात यश मिळविले. इंग्रजी शाळांच्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्येत कमालीची घट होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कारंजा तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शासनाची हाक अन् शाळा विकासासाठी मिळालेला निधी व गावकर्‍यांचा लोकसहभाग घेऊन १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात आल्या. तालुक्यात डिजिटल शाळा या प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली, ती झोडगा बु. येथील जिल्हा परिषद शाळेत. पोहा येथील जिल्हा परिषदेची शाळा ही तालुक्यातील दहावी डिजिटल शाळा ठरली. पोहा येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या हस्ते तसेच मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल युगात संगणकाच्या माध्यमातून शिक्षण द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील पालकांकडून व्यक्त करण्यात येत असून, ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाला सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संमतीने एक अभिनव संकल्पना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांना नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शासनाकडून शाळांना मिळणारे १७ हजार ५00 रुपये अनुदान आणि लोकवर्गणीतून ३२ हजार ५00 रुपये असे एकूण ५0 हजार रुपये खर्च करून डिजिटल शाळा सुरू करण्याची किमया तालुक्यातील १0 शाळांतील शिक्षक वृंदाने केली आहे. कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या पुढाकाराने ३२ हजार ५00 रुपये लोकवर्गणीतून गोळा करण्यासाठी शाळेचे शिक्षक व गावकर्‍यांनी प्रयत्न केले आणि १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात त्यांना यश मिळवले. तालुक्यात झोडगा, पोहा, काळी कारंजा, धोत्रा जहागीर, येवता, खेर्डा कारंजा, ढंगारखेड (मराठी), ढंगारखेड (उर्दू), मोखड (मराठी), सुकळी येथे डिजिटल शाळा कार्यान्वित झाल्या आहेत.