शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

By admin | Updated: June 29, 2016 00:45 IST

धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली.

पुणे : धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली. संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे तसेच रमजान ईदचा सण असल्याने आणखी ८ दिवस वाट पाहून ८ जुलैपासून वाढीव पाणीकपात लागू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. याच वेळी शहराला आता पाणी पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांची असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी पानशेत व वरसगाव या धरणांतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला नाही; त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने त्यावर मार्ग काढण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये वारी व रमजान ईद झाल्यानंतर १० दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हवामान खात्याने ७ दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, हा सांगितलेला अंदाज चुकीचा ठरला आहे. धरणांनी तळ गाठलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी गाळमिश्रित पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या धरणसाठ्यात १.५४ टीएमसी पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’पाण्याचे कोणतेही नियोजन अद्याप पालकमंत्र्यांकडून करण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. >मुळशी धरणाच्या पत्रव्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नाही : स्थिती गंभीरसध्या पाण्याची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. पाण्याचा आणखी एक पर्याय म्हणून मुळशी धरणातील पाण्याकडे पाहिले जात आहे. शहराला या धरणातून पाणी पुरविण्याबाबत विचार व्हावा, याकरिता महापौरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र पाठविले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अद्याप त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.विहिरींची स्वच्छता करण्याच्या सूचनापाऊस न झाल्यास आपत्कालीन उपाययोजना म्हणून शहरातील सर्व विहिरींमधील गाळ काढण्यात यावा. त्याचबरोबर, बोअरवेलची माहिती घेण्यात यावी. कोणत्या भागांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, याची यादी करावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.