शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: May 17, 2016 20:44 IST

15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18 मे पासून येवला शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १७ : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरविण्याच्या नगरपालिकेचा प्रयत्न असल्याने 18  मे पासून येवला शहराला 10  दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ 17 द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी आगामी  1 जुलै पर्यंत पुरवण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.पाणी जून अखेर पुरवण्याचे आव्हान पेलवले जाणार नसल्याची चिन्हे आहेत.पाऊस जर आला नाही तर जुनच्या पहिल्या आठवड्यात  पाण्यासाठी शहरवासीयांची वनवन होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.यंदाच्या पालखेड आवर्तनां प्रमाणे पुढील आवर्तन येण्यास देखील विलंब झाला होता.सध्या  येवला शहरातील साठवण तलावात उपलब्ध 17  द ल घ फुट पाण्याच्या  साठ्यातून येवला शहराला 10  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ,मुख्याधिकारी  राहुल वाघ,पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख,अभियंता जे.बी.फुलारी  यांनी केले आहे. तसेच नळांना तोट्या बसवाव्या, नादुरुस्त नळ तातडीने दुरस्त करून घ्यावे.शहराला पिण्यासाठी रोज 50 लाख लिटर पाणी लागते. सध्याचे 17 द.ल. घ.फुट पाणी 10 दिवसाच्या अंतराने शहरवासियांना दिले तर 15 जून पर्यंत पाणी पुरणार आहे. येवला तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील साठवण तलावात आलेल्या 17 दलघफू पाणी शिल्लक आहे.पाण्याचे काटेकोर नियोजन केले नाही तर अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर उपसा यामुळे जून च्या पहिल्या आठवड्यात नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये हि अपेक्षा आहे. साठवण तलावालगत असलेल्या काही विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जाण्यापूर्वीच आता पालिकेने पाण्याबाबत काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.पालिकेने अनधिकृत पाणी उपश्या बाबत पथके तयार केली असली तरी अवैध मार्गाने पाणी उपसा चालू असल्याची चर्चा शहरात आहे.रात्रीच्या वेळी साठवण तलाव परिसरात पाण्याची विक्री होणार नाही याची देखील पालिकेला काळजी घ्यावी लागेल.अनधिकृत सर्रास पाणी उपसा आजही होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे 125 ते 150 टँकर पाणी शहरातील साठवण तलाव लगतच्या पाणी स्रोतातून भरले जात आहे.