शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बॉम्बस्फोटातील १० दोषींना आज सुनावण्यात येणार शिक्षा

By admin | Updated: April 6, 2016 08:46 IST

मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणातील १० दोषींना पोटा न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणातील १० दोषींना आज (बुधवार) शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आज दुपारी पोटा न्यायालय १० दोषींना शिक्षा सुनावणार असून त्यांना फाशी होते की जन्मठेप याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणाची न्यायालयाने गेल्या आठवड्यात १० जणांना दोषी ठरवले तर तीन जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. अखेर आज दोषींना शिक्षा सुनावली जाईल.
बहिष्कृत असलेल्या ‘सिमी’चा महासचिव साकीब नाचन, अतिफ नाझीर मुल्ला, हसीब झुबैर मुल्ला, गुलाम अकबर खोतल, मोहम्मद कामिलशेख, फरहान मलिक खोत, नूर महम्मद अन्सारी, डॉ. वाहीद अब्दुल अन्सारी, अन्वर अली जावेद खान आणि मुझम्मिल अख्तर अब्दुल अन्सारी यांना विशेष पोटा न्यायालयाने तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले. तर नदीम पोलाबा, हरुन रशीद लोहार आणि अदनान मुल्ला यांची सर्व आरोपांतून सुटका केली.
 
हत्या, देशाविरुद्ध युद्ध छेडले..
तिन्ही बॉम्बस्फोटांचा एकच कट रचण्यात आल्याने या तिन्ही बॉम्बस्फोटांचा खटला एकत्रित चालवण्यात आला. सर्व आरोपींना हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे व अन्य आयपीसी कलमांखाली तसेच आर्म्स अ‍ॅक्ट, रेल्वे अ‍ॅक्ट, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स अ‍ॅक्ट आणि पोटाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांना कोणती शिक्षा द्यायची यावर बुधवारी सरकारी वकील रोहिणी सॅलियन व बचावपक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होईल.
 
सूड उगवण्यासाठी बॉम्बस्फोट
६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये असलेल्या मॅकडोनल्ड रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट झाला. दुसरा बॉम्बस्फोट २७ जानेवारी २००३ रोजी विलेपार्ले येथील भाजीबाजारात झाला. तर तिसरा बॉम्बस्फोट सीएसटी- कर्जत या लोकलमधील महिला डब्यात मुलुंड स्टेशनला झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या सर्व आरोपींनी बाबरी मशीद पाडल्याचा व गुजरात दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट केले.
 
साकीब नाचन सूत्रधार 
स्फोटाचा सूत्रधार साकीब नाचन व लष्कर- ए- तोयबाचा पाकिस्तानी सदस्य फैझल खान यांनी २३ जणांसह हे बॉम्बस्फोट घडवले. या केसमधील पाच जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. तर पाच जण अद्याप फरारी आहेत. बॉम्बस्फोटासाठी मनुष्यबळ, दारुगोळा पुरवण्याचे काम नाचनने केल्याचा आरोप आहे.