शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे १० आमदार सेनेच्या टप्प्यात?

By admin | Updated: June 12, 2014 04:33 IST

लोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अतुल कुलकर्णी , मुंबईलोकसभा निवडणुकीनंतर जोमात आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही विद्यमान आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेने राज्यातील दहा असे आमदार हेरून ठेवले असून त्यांना आमदारकीच्या तिकीटासोबतच निवडून आणण्यासाठीची रसद देखील पुरवली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे पानीपत झाले. त्यामुळे विदर्भातील या दोन पक्षाचे आमदार आत्ताच हवालदिल झाले आहेत. नांदेड-हिंगोली सोडले तर तीच अवस्था मराठवाड्याची आहे. सेनेने काँग्रेसच्या ज्या आमदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे त्या जागा भाजपाच्या वाट्याच्या आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. तर भाजपाने राष्ट्रवादीचे आमदार हेरणे सुरू केले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नाराज आमदारांची पहिली पसंती भाजपा आहे. मात्र मतदारसंघांमधील स्थानिक गणिते लक्षात घेऊन काही नाराज काँग्रेस आमदारांनी शिवसेनेकडे कल दाखवला आहे. या दहा आमदारांचे नेतृत्व कोण करीत आहे, याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे. वाट्याला आलेल्या पण भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस निवडून आलेल्या जागा शिवसेनेच्या टप्प्यात आहेत. उद्या शिवसेनेला दूर करण्याची भूमिका भाजपाने घेतलीच तर भाजपाच्या विरोधात हे हत्यार वापरायचे, असाही यामागे दूरगामी विचार आहे. भाजपा आज जरी राज्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर दिसत असली तरी भाजपाने आत्तापर्यंत तीन सर्व्हे करुन घेतले आहेत. त्यात अ, ब, क असे तीन गट पाडले आहेत. सर्व्हेमध्ये ज्यांना ‘अ’ गट मिळालेला आहे त्या जागी भाजपा स्वत:ची महत्वाची माणसे उभे करेल. ‘ब’मध्ये दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे तर जे मतदारसंघ ‘क’ दर्जात आहेत त्या जागा महायुतीत मित्र पक्षांना सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे. रामदास आठवले आणि विनायक मेटे यांची जबाबदारी शिवसेनेने घ्यायची तर महादेव जानकर, राजू शेट्टी यांची जबाबदारी भाजपाने घ्यायची अशी विभागणी गोपीनाथ मुंडे असताना झालेली होती.आठवले यांना शिवसेनेने महायुतीत आणले मात्र भाजपाने खासदारकी दिली. आता त्यांचे मंत्रीपद शिवसेनेच्या कोट्यातून दिले जावे असा भाजपाचा आग्रह आहे.