शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

मध्य रेल्वेवर धावणार १0 बम्बार्डियर लोकल?

By admin | Updated: November 5, 2016 04:52 IST

पश्चिम रेल्वेवर नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने दाखल होत असतानाच यापासून मध्य रेल्वे वंचित राहिली

मुंबई : पश्चिम रेल्वेवर नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने दाखल होत असतानाच यापासून मध्य रेल्वे वंचित राहिली होती. मात्र बम्बार्डियरचा अनुभव मध्य रेल्वे प्रवाशांनाही मिळावा यासाठी सुमारे १० नव्या लोकल ताफ्यात आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. परंतु ट्रॅकची कमी असलेली क्षमता यामुळे नव्या बम्बार्डियर लोकलपासून हार्बर व ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर वंचितच राहणार असल्याची शक्यता आहे. एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एयूटीपी-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्यात पश्चिम रेल्वेवर आणल्या जात आहेत. तत्पूर्वी ७२ बम्बार्डियर लोकल मुंबईत टप्प्याटप्प्यात दाखल करतानाच त्यापैकी ४0 लोकल या मध्य रेल्वेच्या वाट्याला होत्या तर ३२ पश्चिम रेल्वेसाठी होत्या. मात्र नव्या लोकल स्थिर होर्इंपर्यंत मध्य रेल्वेवर मोठ्या तांत्रिक समस्या उद्भवतील अशी कारणे पुढे करत या लोकल मध्य रेल्वेकडून नाकारण्यात आल्या. मार्च २0१५मध्ये पहिली बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेवर धावली. ही लोकल धावण्यासही एक वर्ष लागले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नव्या लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ७२पैकी ५८ लोकल पश्चिम रेल्वेकडे दाखल झाल्या आहेत. उरलेल्या किमान १० लोकल मध्य रेल्वेला मिळाव्यात यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. या लोकल आल्यास त्या मेन लाइनवरच चालविल्या जातील. महत्त्वाची बाब म्हणजे मेन लाइनच्या ट्रॅकची क्षमता ही ताशी १0५ किलोमीटरपर्यंत वेग सहन करण्याची आहे. तर हार्बर, ट्रान्स हार्बरवरील ट्रॅकची क्षमता ताशी ८५ किमीपर्यंत आहे. हार्बर, ट्रान्स हार्बरवर सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असल्या तरी ट्रॅक क्षमतेत त्या ‘फिट’ ठरल्या आहेत. मात्र बम्बार्डियर लोकल त्यात समाविष्ट करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. तरीही त्याची पडताळणी केली जात आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४४ लोकल आहेत. परंतु यापैकी १२२ लोकलच मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बरवर चालविल्या जातात. (प्रतिनिधी)>धावणाऱ्या १२२ लोकलभेल - ५ लोकलसिमेन्स - ८९ लोकलरेट्रोफिटेड - २८ लोकलम.रे.च्या १६६0 फेऱ्या मेन लाइनवर - ८३८ फेऱ्याहार्बरवर - ५९0 फेऱ्याट्रान्स हार्बरवर - २३२ फेऱ्या>हार्बर व ट्रान्स हार्बरवर १२२पैकी ४६ लोकल धावतात. यातही १८ लोकल सिमेन्स कंपनीच्या आहेत.