शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!

By admin | Updated: June 10, 2014 01:10 IST

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे.

म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे. त्यानंतर १९ जूनला स्वीकृत अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, २५ जूनला म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या एकूण ऑनलाईन अर्जांची संख्या १ लाख २३ हजार २५४ एवढी आहे.म्हाडा लॉटरीसाठी मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण सदनिकांची संख्या एकूण २ हजार ६४१ एवढी आहे. लोकसभा निवडणूकांमुळे म्हाडा लॉटरी प्रक्रियेस विलंब झाला होता. त्यातच सदनिकांच्या किंमतीत म्हाडाने घोळ घातल्याने समस्येत आणखीच भर पडली. शिवाय म्हाडा लॉटरीतील घरांसाठी मिळणारा कमी प्रतिसाद पाहता म्हाडाने अर्ज करण्यासाठीची मुदत वाढविली. आणि १५ जूनऐवजी २५ जूनला लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय सदनिकेच्या किंमतीचा गोंधळ कमी करण्यासाठी प्राधिकरणाने मंजूर केलेल्या किंमतीच्या धोरणाला अनुसरून म्हाडाने मुंबई, विरार व वेंगुर्ल्यातील घरांच्या किमतींमध्ये १०.५ टक्के कपात केली.दरम्यान, ९ जून रोजी ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यानंतर सदनिकांसाठी म्हाडाकडे दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या १ लाख २३ हजार २५४ एवढी आहे. यात मुंबई मंडळाकडे दाखल झालेल्या अर्जाची संख्या १ लाख १० हजार ९१० एवढी आहे. आणि यातील ७४ हजार १३६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. तर कोकण मंडळाकडे दाखल झालेल्या अर्जांची संख्या १२ हजार ३४४ एवढी आहे. यातील ७ हजार ९३४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे, अशी माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)