शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

किराणा दुकानदाराच्या मुलीला एक कोटीचे पारितोषिक

By admin | Updated: April 15, 2017 00:45 IST

शहरातील खंडोबा गल्लीत राहणाऱ्या व पुण्यात एआयएसएसएमएस महाविद्यालयात बीई द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या मुलीला डीजी धन योजनेअंतर्गत

- राजकुमार जोंधळे,  लातूर

शहरातील खंडोबा गल्लीत राहणाऱ्या व पुण्यात एआयएसएसएमएस महाविद्यालयात बीई द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या मुलीला डीजी धन योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचे कॅशलेस व्यवहारासाठीचे पारितोषिक जाहीर झाले. नागपुरात तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होताच शुक्रवारी लातूरमधील तिच्या घरी नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला.लातूरच्या खंडोबा गल्लीत लहानाची मोठी झालेल्या श्रद्धाचे शिक्षण गोदावरीदेवी लाहोटी कन्या शाळेत झाले. तिचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून किराणा दुकान चालवितात. दुकानावरच्या मजल्यावर त्यांचे घर आहे. श्रद्धाने काही दिवसांपूर्वी हप्त्यावर मोबाइलची खरेदी केली होती. त्याचा हप्ताही तिने डिजिटल माध्यमातून भरला होता. दरम्यान, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विशेष योजनेत तिला १ कोटींचे पारितोषिक मिळाले. चार दिवसांपूर्वी कळलेश्रद्धाचे लातूरच्या गंजगोलाईतील सेंट्रल बँकेत सहा महिन्यांपूर्वी खाते उघडण्यात आले होते. या खात्याला पारितोषिक लागणार असल्याने शाखा व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी तिचे घर गाठून तिचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार असल्याचे कळविले होते. मात्र पारितोषिक १ कोटीचे असल्याचे सत्कारावेळीच कळले. त्यानंतर मेंगशेट्टे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.