शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात कमाविले १ कोटी २ लाख !

By admin | Updated: November 7, 2016 22:25 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने रविवार ६ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १ कोटी २ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

धुळे, दि. 7 - राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने रविवार ६ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १ कोटी २ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. यामुळे धुळे विभाग राज्यात दुसऱ्या स्थानांवर पोहचला असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, उत्पन्न मिळविल्याचा इतिहासातील पहिलीच घटना असल्याचा दावाही त्यांनी केला़ यंदाच्या वर्षी दिवाळी सणाचे औचित्यसाधून काही मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते़ नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, सातारा, जळगाव, अहमदाबाद, बडोदा, सुरत, वापी आदी गावांकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात आले होते़ मध्यवर्ती कार्यालयनियोजनानुसार मध्यवर्ती कार्यालयासाठी ५० बसला परवानगी देण्यात आली होती़ १९ हजार ९४ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र ४६ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ त्यात १७ हजार ९४४ किमी इतका प्रवास झाला़ प्रादेशिक कार्यालय प्रादेशिक कार्यालयासाठी १७ बसला परवानगी देण्यात आली होती़ ६ हजार ६४६ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र, १७ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ ६ हजार ६४६ किमी इतका प्रवास झाला आहे़ आंतर राज्याची स्थिती आंतर राज्यासाठी ५३ बसला परवानगी देण्यात आली होती़ ४० हजार ६११ किमी इतके अंतर त्यासाठी निश्चित करण्यात आले होते़ मात्र, ४८ बसेस या मार्गावर फिरविण्यात आलेल्या होत्या़ ३६ हजार ४३६ किमी इतका प्रवास करण्यात आलेला आहे़ २६ आॅक्टोबरपासून वेगदिवाळीत जादा कालावधीत जनतेच्या सोईसाठी २२ आॅक्टोबर २०१६ पासून फेऱ्या चालविण्याची मंजूरी प्राप्त झालेली होती़ मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्याने २६ आॅक्टोबरपासून जादा वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली़ दरम्यान, धुळे विभागातील ९ आगारात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले़ >यंदाच्या वर्षी ३१ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली होती़ तत्पुर्वी २२ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत धुळे विभागाने ४५ लाख २१ हजार किमी इतके अंतर पूर्ण केले़ त्याद्वारे १२ कोटी १४ लाख इतके उत्पन्न मिळविण्यात आले आहे़ अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे़