शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

अवघ्या तीन तासांत १९१ अर्ज

By admin | Updated: June 8, 2016 02:02 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंगळवारपासून विद्यार्थ्यांनी वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी केली असून अवघ्या तीन तासांत छायाप्रतींसाठी १९१ अर्ज दाखल झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असमाधान असल्याने छायांकित प्रत तसेच गुणपडताळणी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येतो.दहावी- बारावीच्या निकालानंतर वाशीतील बोर्डात अर्जांचा पाऊस सुरु झाला आहे. छायाप्रतींचे शुल्क प्रत्येक विषयाला ४०० रुपये इतके, गुणपडताळणीसाठी ५० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. दहावीसाठी छायांकित प्रतीसाठी २७ जून ही शेवटची तारीख असून गुणपडताळणीसाठी १६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये आकारण्यात येणारे शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने संबंधित विभागीय मंडळामध्ये जमा करण्याच्या सूचनाही बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही अर्ज भरण्यासाठी वाशीतील शिक्षण मंडळाकडे धाव घेतली आहे. गुण पडताळणीकरिता अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत (संकेतस्थळावरील प्रिंटआऊट) जोडणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशाकरिता मुंबई विभागातील मान्यताप्राप्त शाळांची संख्या ११५६ इतकी असून यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई १ आणि मुंबई २ यांचा समावेश आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.हल्लीचे विद्यार्थी मिळालेल्या गुणांनी समाधानी नाहीत. आपली स्वत:ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत असून छायाप्रतीच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना स्वत:चा आरसा पाहण्याची संधी मिळते. यंदा गुणपडताळणी तसेच छायाप्रतीसाठीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. - डॉ. सुभाष बोरसे, सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळबारावीच्या १६१९ विद्यार्थ्यांचे अर्जबारावीच्या निकालानंतर गुणपडताळणीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून असून १६१९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. यामध्ये कला शाखेतील १२३ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ५०९ आणि विज्ञान शाखेतील ९७७ अर्ज आले आहेत. छायांकित प्रतीसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार असून सोमवारपर्यंत आलेल्या अर्जांची संख्या ५ हजार ९६८ इतकी आहे. यामध्ये कला शाखेतील २३१, वाणिज्य शाखेतील १६६० आणि विज्ञान शाखेतील ४०९५ अर्ज आल्याची माहिती बोर्डाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट अर्ज येण्याची शक्यता बोर्डाकडून वर्तवण्यात येत असून १४ जूनपर्यंत अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.