शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

By admin | Updated: April 12, 2017 14:14 IST

विद्यापिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामध्ये संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.

- प्रा. महेश मधुकरराव जानोळकर, अमरावती विद्यापिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामध्ये संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.

आजकाल प्रत्येक विद्यापीठातून शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक पीएचडी/ डॉक्टरेट पदवी घेऊन बाहेर पडतात. पण खरंच ते संशोधन करतात का? त्यांचे मार्गदर्शक यांचे अॅप्लिकेशन कुठे आहे याचा पाठपुरावा करतात का? किंवा या संशोधनाचे अ‍ॅप्लिकेशन कुठे आढळून येते का? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, कमीतकमी विद्यापीठातील संशोधनासाठी तरी नाही हेच उत्तर योग्य!

कारण प्राध्यापक हा संशोधन/पीएचडी हे फक्त इन्क्रिमेण्ट आणि प्रमोशन साठीच करतो, त्याचा मुळ पेशा शिकवणे/आहे हे मात्र काहीजण विसरतात. संशोधनापुढे टीचिंग हे शून्य असेच विद्यापीठ मानते, त्यावरच प्राध्यापकाचे महत्त्व विद्यापीठ ठरवते. मग प्राध्यापक तरी काय करणार, तेही लागतात संशोधनाच्या मागे.इंग्रजीमध्ये संशोधन म्हणजे रिसर्च. ते होतं का?

पेड जर्नलला पाठवणे,ते पेपर म्हणून छापून आणणे, बस्स झाले तुमचे संशोधन. प्राध्यापकाच्या नावामागे पेपर वाढणार अन् विद्यापीठ पण त्या पेपरचे पॉइंट्स देणार, पुढे जाऊन हेच पॉइंट्स प्रमोशनसाठी उपयोगात येणार. मग काय याचप्रकारे चालतं हे संशोधन. याच संशोधनाला वापरून अजुन कुणीतरी दोन-चार पेपर पब्लिश करणार. प्रथम संशोधन करणाऱ्याची महती वाढणार. मग काय झाला ना तो फेमस.

मग काय गूगलवर त्याच्या पेपरचे रिव्ह्यूज अन सिटीशन वाढणार, मग इन्क्रीमेंट अन प्रमोशन. खरे पाहिले तर त्या संशोधनाचा ना कुठल्या खऱ्या संशोधनासाठी उपयोग ना समाजासाठी उपयोग, फक्त पेपर चा काउंट वाढणार. यामुळे खरा शिक्षक/प्राध्यापक हा शिकवण्यापासून कुठे तरी दूर जाणार.

सगळेच असं करतात असं नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण संशोधन अशा रितीनं करणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढतं आहे.