कशामुळे होतो...
अस्वच्छता व घाण पाण वाहत असेल तर अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. या अस्वच्छतेतून झिका हा आजार उद्भवू शकतो. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या सभोवतलाचा परिसर स्वच्छ ठेवावा.
झिका व्हायरसची लक्षणे काय...
झिका आजाराची लक्षणे ही डेंग्यु आजारासारखी आहेत. या आजाराचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. डोके दुखणे, ताप येणे, थकवा येणे आदी लक्षणे आढळतात.
स्नायु दुखी, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे दुखणे, डोळे दुखणे आदी प्रकारची लक्षणे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आली आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रक्तनमुन्याची केली जाते तपासणी...
राष्ट्रीय रोगनिदान संस्था नवी दिल्ली, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे झिका या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. डेंग्यू आजाराप्रमाणे झिका संशयित रुग्णांचे रक्त तपासणी केली जाते.
लक्षणे आढळल्यास सल्ला घ्यावा...अस्वच्छता आणि घाण पाणी वाहत असेल तर अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सद्य:स्थितीत जिल्ह्यात झिका आजाराचा एकही रुग्ण नाही. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी