शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जिल्ह्यात दोन टप्प्यात गोळ्या वाटपासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच ...

कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे कृमीदोषाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणूनच १ ते १९ वयोगटातील मुलाला जंतनाशक गोळी वर्षातून किमान एक दिलीच पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या...

१ ते १९ वर्षे वयाच्या मुलांना जंताचा त्रास जास्त होऊ शकतो. आतड्यांमधल्या जंतांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठीच वर्षाला जंतनाशक गोळ्यांचे मुलांना वाटप केले जाते. एकदा का जंतांनी शरीरात प्रवेश केला की ते आतड्यात प्रवेश करतात. ते आतड्यातले थर नष्ट करतात. त्यामुळे शरीरात अन्नघटकांचे शोषण नीट होत नाही. म्हणूनच १९ वर्षांपर्यंत जंतनाशक गोळ्या घेण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.

जिल्ह्यात जंतनाशक गोळ्या वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा लवकरच राबविला जाणार आहे. १ ते १९ वयोगटातील एकही बालक यापासून वंचित राहू नये, त्यादृष्टीने आम्ही पूर्ण नियोजन केले आहे. -डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

काय आहे जंतदोष?

मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, ते लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल तर जंत झाल्याचे ओळखावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेषत: अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शाळेतच जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. आरोग्यसेविका, आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेही गोळ्यांचे वाटप होते. जिल्हा परिषदेबरोबरच सर्व शासकीय रुग्णालयातही जंतनाशक गोळ्यांचे वाटप होते.

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांतही जंतनाशक गोळ्या उपलब्ध होत आहेत. याठिकाणी नागरिक जाऊन गोळ्या घेऊ शकतात, तसेच आरोग्यसेविका, आशा, गटप्रवर्तक यांच्याशी संपर्क साधला तरीही त्या जंतनाशक गोळ्यांची उपलब्धता करून देऊ शकतात.