शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामे भाजपची, उद्घाटने राष्ट्रवादीच्या नेत्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

औसा तालुक्यातील येळवट येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत किल्लारीसह भूकंप पुनर्वसित गावातील ३० खेडी पाणीपुरवठा योजनेच्या २८ कोटी ५८ ...

औसा तालुक्यातील येळवट येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत किल्लारीसह भूकंप पुनर्वसित गावातील ३० खेडी पाणीपुरवठा योजनेच्या २८ कोटी ५८ लाख खर्चाच्या पुनरुज्जीवन टप्पा २ कामाच्या प्रारंभानिमित्त ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, माजी आ. पाशा पटेल, सुशीलदादा बाजपेयी, अरविंदराव कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, संताजी चालुक्य, संजय कुलकर्णी, प्रकाश पाटील, जयपाल भोसले, अश्विनीताई घाडगे, संयोजक माजी जि.प. सदस्य बंकट पाटील, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशनी जाधव, युवराज बिराजदार, सरपंच रमेश कांबळे, उपसरपंच शिवाजी जाधव उपस्थित होते.

माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ८ हजार पाणी योजनांची कामे अर्धवट होती. ही कामे आमची सत्ता आल्यावर पूर्ण केली. यावेळी माजी आ. पाशा पटेल म्हणाले, आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले नाही. मात्र, आ. अभिमन्यू पवार यांनी प्रत्येक गावाचा दौरा करून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड होत आहे. यावेळी बांबू लागवडीविषयी माहिती दिली. आ. अभिमन्यू पवार म्हणाले, औसा शहरासह ३० खेडी, खरोसा व मुरूड पाणीपुरवठा योजनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिला. निधी कमी पडू नये म्हणून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भरीव मदत दिली. औसा शहरातील नागरिकांची तेरणा धरणातून पाण्याची मागणी असताना ही योजना तेव्हा का सुरू करता आली नाही, असा सवाल उपस्थित केला. प्रास्ताविक काकासाहेब मोरे यांनी केले.