शासकीय रुग्णालयांत तुटवडा नाही...
शासकीय रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नाही. रुग्णांच्या आवश्यकतेप्रमाणे इंजेक्शन उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी दिली.
बेभाव विक्री होणारे इंजेक्शन येतात कोठून?
उपलब्ध रेमडेसिविर औषधीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने संपूर्ण नियंत्रण ठेवले आहे. जो साठा मिळतो, तो खाजगी रुग्णालयांना वितरीत केला जातो. मात्र मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. दुसरीकडे बेभाव विक्री होणाऱ्या इंजेक्शनचा साठा कोठून कसा येतो आणि परस्पर विक्री कोण करतो, याचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्न औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, उपलब्ध साठा व्यवस्थित वितरीत करण्यावर पूर्ण नियंत्रण आहे. परंतु, गैरमार्गाने व चुकीच्या पद्धतीने कोण करीत आहे, याचाही सुगावा लागत नाही. एकंदर, यंत्रणाही मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.