शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शरदराव तुम्ही सुद्धा कशा लोकांसोबत आहात?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पवारांना उपरोधिक टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:17 IST

परोधिक भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिकास्त्र सोडले.

लातूर : दोन पंतप्रधानांची भूमिका घेणाऱ्या महाआघाडीसोबत शरदराव तुम्हीसुद्घा कसे काय आहात? असा सवाल उपस्थित करीत उपरोधिक भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिकास्त्र सोडले.

लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सकाळी औसा येथे जाहीर सभा झाली. मोदींनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपा सरकारच्या योजनांवर विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, राजकारण ठिक आहे. परंतु शरद पवार हे सुद्घा अशा लोकांसोबत आहेत, त्यांना हे शोभून दिसत नाही. पाकिस्तानचे विमान पाडले की, पाडले नाही यावर सैन्यांनी किती पुरावे द्यायचे. तुम्हाला तुमच्या वीर जवानांवर विश्वास नाही. याउलट देशाला शिव्या देणारे, देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना खुला परवाना देण्याचे धोरण काँग्रेसचे आहे. जे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करुन स्पष्ट केले आहे. राष्ट्रवाद आमची प्रेरणा आहे आणि सुशासन हा आमचा मंत्र आहे. मात्र विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. आमचे धोरण दहशतवाद्यांच्या भूमित घुसून मारण्याचे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

महायुतीचे देशहितासाठी काम विकासयोजनांचा पाढा वाचताना मोदी म्हणाले, महायुतीने देशहितासाठी काम केले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. प्रत्येकाला पक्के घर दिले जाईल. शेतकरी सन्मान योजनेत आता सर्वच शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करु, ४० कोटी असंघटित कामगारांना तीन हजार नियमित पेन्शन देऊ. आम्ही आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागासांना दहा टक्के आरक्षण दिले. गाव तिथे वीज नेली. गॅस पोहचविला. शौचालय उभारले. सर्वांचे बँक खाते काढले. आम्ही लवकरच जलशक्ती हे स्वतंत्र मंत्रालय स्थापित करु असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019