हाळी हंडरगुळी येथे रविवारी जनावरांचा व भाजीपाल्याचा बाजार भरतो. जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी येथे येतात. तसेच येथील आठवडी बाजारात स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने परिसरातील पंधरा ते वीस गावांतील नागरिक येथे बाजारासाठी येतात. परिसरातील काही नागरिकांना याची माहिती नसल्याने नागरिक बाजारासाठी आले होते. याचा फायदा काही विक्रेत्यांनी घेतला. दुपारी दोन वाजेपर्यंत बाजारात शुकशुकाट होता; मात्र दुपारनंतर थोडीफार गर्दी झाली होती. सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस प्रशासन यावर विशेष लक्ष ठेवून होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यातील बाजार भरण्यावर बंदी आणली आहे. शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.